“तुम्हाला लढायचं असेल तर माझ्याशी लढा, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला” प्रणिती शिंदे

0

सोलापूर,दि.28: काँग्रेस नेत्या आमदार प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. भाजपाने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. राम सातपुते यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली होती. शिंदे यांनी त्यांच्या मालमत्तेचा हिशेब द्यावा असे आव्हान सातपुते यांनी दिले.

लाज वाटायला पाहिजे तुम्हाला…

आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सातपुते यांचे नाव न घेता प्रणिती शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे. घरातून चांगले संस्कार मिळावे लागतात, ते तुमच्याकडे नाहीत, 83 वर्षांचे असूनही पवार साहेब व माझे वडील महाराष्ट्र पिंजून काढतात, तुम्हाला लढायचं असेल तर माझ्याशी लढा, मी उभी आहे, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, अशा शब्दांत प्रणिती शिंदे यांनी नाव न घेता जोरदार टीका केली.

प्रणिती शिंदे या सोलापूर मध्यच्या विद्यमान आमदार आहेत. त्या सलग तीन वेळा निवडूण आल्या आहेत. सोलापूर लोकसभेचे जयसिध्देश्वर महास्वामी विद्यमान खासदार आहेत. भाजपाने यावेळी राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here