समान नागरी कायद्यावर प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य

0

अकोला,दि.15: समान नागरी कायद्यावर प्रकाश आंबेडकरांनी मोठे वक्तव्य केले आहे. वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रकाश आंबेडकरांनी प्रसिद्ध केला. यावेळी त्यांनी भाजपा आणि संघावर टीका केली. भारतीय जनता पक्ष इथल्या हिंदू मतदारांना फसवत असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे. NRC आणि CAA मुस्लिमांच्या विरोधात आहे. पण प्रत्यक्षात ते 20 टक्के हिंदू समाजाच्या विरोधात असल्याचेही आंबेडकरांनी म्हटले आहे.

समान नागरी कायदा हा संविधानाला धोका नाही. पण हा आरएसएसला धोका आहे. आमच्यासारख्या धर्मनिरपेक्ष पक्षांचा तोटा होणार नाही, तर हा तोटा धर्मावर आधारित राजकारण करणाऱ्या पक्षांचा होणार आहे. विशेषतः भाजप, आरएसएस आणि बजरंग दल यांचा मोठ्या प्रमाणात तोटा होणार आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.

प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसवर टीकास्त्र सोडले. तसेच महात्मा गांधींना वंचितांनी सवर्ण नेतृत्वाच्या विरोधात उभे केले. तुषार गांधी यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आम्ही इथल्या वंचितांना उभे करत आहोत. इथल्या सवर्ण नेतृत्वाच्या विरोधात उभे करत आहोत, त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यायला हवा होता, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

कंत्राटी कामगाराला 58 वर्षांपर्यंत निवृत्त करायचे नाही, असा धोरणात्मक निर्णय आम्ही घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा आणि हमीभावाच्या कायद्याचे कोणी उल्लंघन करेल त्याला आर्थिक शिक्षेबरोबरच गुन्हेगारी शिक्षा देखील असेल असेही जाहिरनाम्यात नमूद करण्यात आल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परदेशात जातो आणि तो अर्थव्यवस्थेवर बोजा आहे असे आम्ही मानतो. शिक्षण हे खासगी करून शिक्षण महर्षींनी कैदी केले आहे. या शिक्षण धोरणाला कैदेतून मुक्तता देत शिक्षणाबाबत सरकार आणि सार्वजनिक संस्था संमिश्र भूमिका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण असले पाहिजे, ही मागणी देखील आम्ही करत आहोत. आम्ही सरकारमध्ये आल्यावर एस. सी, एस. टी यांना जे आरक्षण मिळत आहे त्या संदर्भातली स्पष्ट भूमिका घेणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here