मुंबई,दि.2: Prakash Ambedkar On UPA: प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) युपीएच्या (UPA) अध्यक्षपदासाठी नाव सुचवलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांना युपीएचे अध्यक्ष करण्याची मागणी केली जात असताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दुसरे नाव सुचवले आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पर्याय देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
भाजपाला थोपवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली जात असताना दिल्लीत 31 मार्च रोजी झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महत्वाचा ठराव मंजूर करण्यात आला.
देशातील सध्याच्या कठीण राजकीय परिस्थितीत शरद पवार यांनीच काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व करावे, असा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला. या बैठकीला स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. सर्वानुमते शरद पवारांनी नेतृत्व करावं यासाठीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
काँग्रेस नेतृत्व करु शकत नाही, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे म्हणणे आहे. शरद पवारच देशातील विरोधकांना एकत्र आणू शकतात आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपाला रोखले जाऊ शकते, असे या ठरावात म्हटले आहे. या ठरावानंतर आता काँग्रेस आणि युपीएतील घटक पक्ष काय भूमिका घेतात देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘यूपीए’च्या अध्यक्षपदावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. यूपीएचं नेतृत्व बदलायचं असेल तर ममता बॅनर्जींशिवाय दुसरी कोणतीही योग्य व्यक्ती दिसत नाही असं, प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. तसेच ममता बॅनर्जींशिवाय यूपीएला इतर विश्वासार्ह पर्याय नाही, असंही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.