Sushma Andhare | शिवसेना एक ओपन किचन आहे, जे पोटात ते ओठात: सुषमा अंधारे

Sushma Andhare: तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते

0

सातारा,दि.१३: Sushma Andhare On Tanaji Sawant: तोंडावर एक, मागे एक बोलण्यापेक्षा रोखठोक बोलायला उद्धव ठाकरेंना आवडते. शिवसेना एक ओपन किचन आहे, जे पोटात, ते ओठात असे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे अंधारे (Sushma Andhare) यांनी म्हटले आहे. मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. माझ्या विभागाच्या अखत्यारीत राज्यातील चार वेड्यांचे रुग्णालय येतात. तिथे कुठे जागा असेल तर आदित्य ठाकरे यांना दाखल करुन त्यांच्यावर उपचार करु, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले होते.

सुषमा अंधारे यांचे तानाजी सावंत यांना प्रत्युत्तर | Sushma Andhare On Tanaji Sawant

सावंत यांच्या वक्तव्यावर आता शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या अंधारे यांनी सातारा येथे बोलत असताना तानाजी सावंत यांना प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, “काही लोक आरशात बघून बोलत असतात. कदाचित आमचे बंधू तानाजी सावंत आरशात बघून बोलत असतील.” सातारा येथे पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांच्या आरोपाचा समाचार घेतला.

पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा | Sushma Andhare

आरशात बघून स्वगत बोलणाऱ्या लोकांवर आपण फार व्यक्त न झालेलं बरं. कवी केशवसूत यांच्या कवितेची एक ओळ सांगून सुषमा अंधारे म्हणाल्या की, पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा. त्यामुळे त्यांचे जेवढे डोकं आहे, तेवढं त्यांनी चालवलं आहे. त्यांच्या स्तरावर आम्ही उतरणार नाही. आम्हाला एका अत्यंत सुसंस्कृत, संयमी आणि सभ्य नेतृत्वाचे आदेश आहेत. आम्ही आमची पातळी कधीही सोडणार नाही, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी तानाजी सावंत यांच्यावर टीका केली.

मोदी, शाह यांनी मुंबईतच २ बीएचकेचा फ्लॅट घ्यावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका महिन्यात दुसऱ्यांदा मुंबईचा दौरा केला होता. या दौऱ्यावर टीका करत असताना अंधारे म्हणाल्या की, त्यांनी असे सतत दौरे करु नयेत. अमित शहा किंवा मोदीजी असतील. त्यांनी असे सतत दौरे करुन उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नावाने कंठशोष करण्यापेक्षा ती एनर्जी वाचवून ठेवावी. मुंबईतच एखादा टू बीएचकेचा फ्लॅट घ्यावा आणि इथेच मुक्काम करावा. कारण त्यांनी शिवसेनेची धास्ती घेतली आहे, ही धास्ती त्यांच्या सततच्या दौऱ्याचे द्योतक आहे. येणाऱ्या काळात त्यांना आव्हान फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे देऊ शकतात, हे निश्चित.

शिवसेना एक ओपन किचन आहे, जे पोटात ते ओठात

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला हव्या होत्या, असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केले होते. त्यावर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, संजय शिरसाट यांना १४ तारखेनंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे लांगुलचालन करणे त्यांना गरजेचे वाटते. पण मला आमचे नेतृत्व आवडते, याचे कारण ते फार सच्चेपणाने वागतात. तोंडावर एक, मागे एक बोलण्यापेक्षा रोखठोक बोलायला त्यांना आवडते. शिवसेना एक ओपन किचन आहे, जे पोटात, ते ओठात. त्यामुळे उगाच संजय शिरसाट यांनी आपले रक्त आटवून घेऊ नये, असा सल्ला सुषमा अंधारे यांनी दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here