मुंबई,दि.14: Sanjay Raut VS Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वत:वर उपचार करून घेतले पाहिजे असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. अजित पवारांसोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. 2019 मध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी पहाटे सरकार स्थापन केले होते. हे सरकार फक्त काही तासच चालले होते. ‘2019 मध्ये आम्ही घेतलेल्या शपथविधी संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना माहिती होती, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला होता.
फडणवीस हे जगातलं दहावं आश्चर्य | Sanjay Raut VS Devendra Fadnavis
दरम्यान, फडणवीसांच्या विधानाचा आज खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. फडणवीस हे जगातलं दहावं आश्चर्य असल्याचं ते म्हणाले. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत काय म्हणाले? | Sanjay Raut
देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून ज्याप्रकारची वक्तव्य येत आहे. त्यावर असून वाटतं की देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य आहे. आधीच 8 आश्चर्य या जगात आहेत. आणखी दोन आश्चर्य दिल्लीत आहे आणि एक आश्चर्य महाराष्ट्रात आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
माणसाने किती खोटं बोलावं याला मर्यादा असतात, मुळात तुम्ही विश्वासघात केल्याने हे घडलं. देवेंद्र फडणवीसांनी आधी त्यांची जुनी वक्तव्य काढून बघावी. ते स्वत: अमित शाहांसमोर काय बोलले होते? त्यामुळे स्वत:च विश्वासघात केल्यानंतर आता गळा काढण्यात काय अर्थ आहे, असेही ते म्हणाले.
उद्या फडणवीस म्हणतील की…
उद्या फडणवीस म्हणतील की सहा महिन्यापूर्वी जी बंडखोरी झाली ती शरद पवारांच्या सांगण्यावरून झाली. एका वैफल्यातून ते बोलत आहेत. राज्यात त्यांच्या सरकारविषयी तिरस्कार आहे. विधानपरिषेदेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. पुण्याच्या पोटनिवडणुकीत त्यांना पराभव दिसतो आहे. त्यामुळे ते अशी विधानं करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
आता स्वत:वर उपचार करून घेतले पाहिजे…
अजित पवार ठामपणे महाविकास आघाडीसाठी वातावरण निर्माण करत आहेत आणि भाजपाला आव्हान देत आहेत. तेव्हा आमच्या सर्वाच्या प्रतिमांना तडे देण्यासाठी अशी खोटी विधानं सुरू आहे. मात्र, तरी लोकांचा विश्वास बसणार नाही. पहाटेच्या शपथविधीमुळे त्यांना अजूनही दचकून जाग येते. त्यांनी आता स्वत:वर उपचार करून घेतले पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली.