Sanjay Raut On Sharad Pawar: संजय राऊत यांनी शरद पवारांसंदर्भात केले मोठे वक्तव्य

Sanjay Raut: आम्हाला रात्रीच्या काळोखात भेटण्याची गरज नाही

0

कर्जत,दि.७: Sanjay Raut On Sharad Pawar: संजय राऊत यांनी शरद पवारांसंदर्भात केले मोठे वक्तव्य. कर्जत-जामखेड येथील पत्रकार संमेलनाला आज (७ एप्रिल) शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हजेरी लावली. यावेळी संजय राऊत यांची मुलाखत देखील घेण्यात आली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर रात्री संजय राऊत एक्सप्रेसवेने अचानक शरद पवारांना भेटायला गेले, असा दावा अनेक माध्यमांनी केला होता, तो कितपत खरा आहे, असा सवाल संजय राऊत यांना या मुलाखतीवेळी करण्यात आला. यावर संजय राऊत म्हणाले, आम्हाला (मी आणि शरद पवार) रात्रीच्या काळोखात भेटण्याची गरज नाही. ना मला त्याची आवश्यकता आहे ना पवारांना.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याइतकच शरद पवारांना | Sanjay Raut On Sharad Pawar

संजय राऊत म्हणाले की, मी माझ्या आयुष्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याइतकच शरद पवारांना स्थान देतो. नक्कीच मला बाळासाहेब ठाकरे यांनी मोठं केलं, मला या क्षेत्रात उभं केलं. पण शरद पवार देखील माझ्यासाठी आधारस्तंभ आहेत, आणि जे तुम्ही बोलताय तशा गाठीभेटी शरद पवार घेत नाहीत. त्या दिवशी मी शिवसेना भवनात होते. तिथे मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पाहिली आणि तिथून मी शरद पवारांच्या घरी गेलो.

Sanjay Raut On Sharad Pawar
संजय राऊत

खासदार राऊत म्हणाले की, मी त्या दिवशी पत्रकार परिषद आटोपल्यानंतर शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक येथे गेलो. तिथे मी माध्यमांना मुलाखती देखील दिल्या. मला पत्रकारांनी विचारलं, कशासाठी आला आहात, मी त्यांना म्हणालो, सत्तास्थापनेसाठी आलोय. सरकार बनवायला आलो आहे. त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितलं होतं की, आमच्यापुढे सर्व पर्याय उपलब्ध आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here