भाजपावर गंभीर आरोप करत रोहित पवार यांनी शेअर केले व्हिडिओ

0

मुंबई,दि.18: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. रोहित पवार यांनी भाजपावर बोगस मतदानाचा आरोप केला आहे. बीड लोकसभा मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी दोन व्हिडिओ शेअर केले आहेत.

भाजपकडून बीड लोकसभा मतदारसंघात विशेषतः परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान, मतदान केंद्रे ताब्यात घेणे असे गैरप्रकार करण्यात आले. सत्ताधाऱ्यांची ही दडपशाही रोखण्याची हिंमत बबनभाऊ गीते यासारख्या अनेक सामाजिक कार्यकत्यांनी दाखवली, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

निवडणूक आयोग या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करणारे आहे की फक्त विरोधकांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यातच धन्यता मानणार आहे ? असो पण एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाला आदर्श घालून देणाऱ्या बीड जिल्ह्यात दडपशाहीचे हे प्रकार सत्ताधाऱ्यांना शोभत नाहीत, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here