ठाकरे गटाची 2018 ची घटना अमान्य: राहुल नार्वेकर

0

मुंबई,दि.१०: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज आमदार अपात्र प्रकरणी निकाल दिला. राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाने पक्षाची दिलेली घटना मान्य नाही असे निकालात म्हटले आहे. ठाकरे गटाने 2018 ची घटना ग्राह्य धरावी अशी मागणी केली होती ती नार्वेकर यांनी अमान्य केली आहे.

नाही. निवडणूक आयोगाकडे असलेली प्रत ही शिवसेनेची 1999 सालची घटना असून तीच ग्राह्य धरली जाईल. 2018 सालची घटना ग्राह्य धरा ही ठाकरे गटाची मागणी अमान्य करण्यात आली आहे.

2023 ला दिली गेलेली घटना विधानसभा अध्यक्षांनी मान्य असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे गटाकडून याचिकेत केल्या गेलेल्या दाव्यांवर नार्वेकरांकडून सवाल उपस्थित केले गेले आहेत. तर त्याला उत्तर देताना शिंदे गटाकडून सादर केलेली उत्तरं आणि पुराव्यांशी सहमत असल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेना नेतृत्त्वावरील दाव्यांबाबत निवडणूक आयोगानं दिलेला निकाल स्पष्ट आहे, पक्षात बंडखोरी झाल्यानंतर खरा पक्ष कोणाचा हा मुद्दाही विचारात घेणं महत्त्वाचं होतं, असं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करु शकत नाहीत. पक्षप्रमुख कुणालाही काढू शकत नाही. त्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची अनुमती आवश्यक आहे. अन्यथा लोकशाहीला ते घातक ठरेल.

पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीला घातक आहे. असं झालं तर पक्षाला कुणीच पक्षप्रमुखाविरोधात बोलू शकणार नाही. शिवसेनेच्या घटनेत राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम आहे, असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे.

  • उद्धव ठाकरे उलट तपासणीला आले नाहीत म्हणून ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्र अमान्
  • 23 जानेवारी 2018 रोजी कुठलीही संघटनात्मक निवडणूक झालेली नव्हती
  • निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डनुसार शिंदे गटाची शिवसेना खरी. तेच समोर ठेवलं गेलं. 21 जून 2022 ला जे झालं ते समजून घेतलं पाहिजे, त्या दिवशी शिवसेना फुटली. 2013 आणि 2018 ला शिवसेनेत अंतर्गत निवडणुका झाल्या नाहीत. दोन्ही गट आपणच असली शिवसेना असल्याचा दावा करत आहेत. निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच असली शिवसेना म्हणून मान्यता दिलीय, ते समोर ठेवलं गेलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here