मुंबई,दि.10: आमदार अपात्र प्रकरणाचा थोड्याच वेळात निर्णय येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निकालाचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला आहे. आमदार अपात्रता प्रकरणात निकाल कोणत्या गटाच्या बाजूने लागणार? याची सगळ्यांनाच उत्सुक्ता आहे. कारण या निकालाने बरच चित्र स्पष्ट होणार आहे. या निकालाचे दूरगामी परिणाम होतील.
शिवसेनेनंतर राष्ट्रवादी पक्षातही फूट पडली आहे. अजित पवारांनी पक्षावर दावा सांगितला आहे. त्यामुळे आजचा निकाल महत्वाचा व निर्णायक ठरणार आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. निकालाआधी दोन्ही गटांकडून निकाल आमच्याच बाजूने लागणार असा दावा केला जात आहे. कारण विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर सरकारच भवितव्यही अवलंबून आहे. आमदार अपात्रता प्रकरणात अनेक टेक्निकल, कायदेशीर मुद्दे आहेत. त्यावर विधानसभा अध्यक्षांची भूमिका काय? याकडे कायदे तज्ज्ञाच लक्ष आहे.
निकाल वाचन सुरु असताना तो लाईव्ह करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आमदार अपात्रता निकाल लाईव्ह करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आपण प्रत्यक्ष निकाल वाचन पाहू शकतो. निकालासाठी दोन्ही गटाच्या वकिलांनी उपस्थित रहावे यासाठी विधिमंडळाकडून वकिलांना मेल पाठवण्यात आला आहे.