राहुल गांधी ‘हिंदू’वर संसदेत काय बोलले की उत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदी उभे राहिले?

0

नवी दिल्ली,दि.1: लोकसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होत आहे. यादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चर्चेला सुरुवात करत संविधानाच्या बहाण्याने मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. संविधानाची प्रत हातात घेऊन त्यांनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी राहुल गांधींनी असे वक्तव्य केले ज्यामुळे खळबळ उडाली आहे. यावर पीएम मोदींनी उभे राहून निषेध व्यक्त केला आणि संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही गंभीर बाब असल्याचे सांगितले.

काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधी म्हणाले, ‘मोदीजींनी एके दिवशी आपल्या भाषणात सांगितले की, भारताने कधीही कोणावरही हल्ला केला नाही. त्याला कारण आहे. भारत हा अहिंसेचा देश आहे, तो घाबरत नाही. आपल्या महापुरुषांनी हा संदेश दिला – घाबरू नका, घाबरू नका. शिवजी म्हणतात- घाबरू नका, घाबरू नका आणि त्रिशूळ जमिनीत गाडून टाकतात. दुसरीकडे, जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते 24 तास हिंसा-हिंसा-हिंसा…द्वेष-द्वेष-द्वेष करतात… तुम्ही मुळीच हिंदू नाही. सत्याचे समर्थन करावे असे हिंदू धर्मात स्पष्ट लिहिले आहे.

मोदींनी उभे राहून निषेध व्यक्त केला

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ सुरू केला. पीएम मोदी त्यांच्या खुर्चीवरून उभे राहिले आणि त्यांनी ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही गंभीर बाब असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. यावर राहुल गांधी म्हणाले की, पीएम मोदी आणि भाजप हा संपूर्ण हिंदू समाज नाही. 

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सभागृहात विविध मुद्द्यांवरुन केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी भगवान शंकराचे चित्र दाखवले आणि शंकराच्या अभय मुद्रेचा उल्लेख करत म्हणाले की, काँग्रेस सध्या अभय मुद्रेमध्ये आहे. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हिंसाचारात गुंतल्याची टीकाही केली. 

भगवान शंकराच्या फोटोसह राहुल गांधींनी कुराणचा उल्लेख केला, गुरु नानक आणि येशूंचा फोटोही दाखवला. ते म्हणाले की, कुराणात लिहिले आहे, घाबरू नका. येशू म्हणतात घाबरू नका आणि कुणालाही घाबरवू नका. सर्व धर्मग्रंथांमध्ये अहिंसेचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रत्येकजण अहिंसेबद्दल, भीती घालवण्याबद्दल बोलले आहेत. आपला देश अहिंसेचा देश आहे. अहिंसा हे हिंदूंचे प्रतीक आहे, पण सध्या सत्तेत असलेले हिंदू नाहीत. दुसरीकडे स्वतःला हिंदू म्हणवून घेणारेच चोवीस तास हिंसाचार आणि द्वेषात गुंतले आहेत, अशी टीका राहुल यांनी केली. त्यांच्या या विधानावर लोकसभेत गदारोळ.

अमित शाह म्हणाले…

गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, विरोधी पक्षनेत्याने आपल्या बोलण्याबद्दल माफी मागावी. करोडो लोक या धर्माला अभिमानाने हिंदू म्हणतात. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इस्लाममधील अभय मुद्रेवर इस्लामिक विद्वानांचे मत घ्यावे. गृहमंत्री अमित शहा यांनी आक्षेप घेत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. शहा म्हणाले की, देशातील करोडो हिंदू हिंसक आहेत, असे राहुल यांना म्हणायचे आहे का? विरोधी पक्षनेते माफी मागणार का?, असा सवाल शहा यांनी केला. हिंसाचाराचा संबंध कोणत्याही धर्माशी जोडणे चुकीचे आहे. राहुल यांनी देशाची माफी मागावी, असेही अमित शहा पुढे म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here