कार्यकर्त्यांची कामगिरी दमदार, धर्मराज काडादी होणार आमदार!

0

सोलापूर,दि.16: सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते स्वतः पुढाकार घेऊन घरोघरी प्रचार करत आहेत. श्री सिध्देश्वर परिवारातील सदस्य स्वतःहून प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसेना (ठाकरे गट), भाजपाचे कार्यकर्ते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. 

अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना प्रचारासाठी व खर्चासाठी पैसे दिले जातात. मात्र दुसरीकडे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात धर्मराज काडादी यांचे कार्यकर्ते आदेशाची वाट न पाहता निवडणूक प्रचारात सहभागी झाले आहेत. विविध जाती धर्मातील लोकांनी एकत्र येत काडादींसाठी प्रचार मोहीम राबवली आहे. 

घरोघरी प्रचार करत धर्मराज काडादी हेच कसे योग्य उमेदवार आहेत, याची माहिती मतदारांना कार्यकर्ते देत आहेत. काडादी यांनी आजपर्यंत केलेले सामाजिक कार्य मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्ते करताना दिसत आहेत. यामुळे “कार्यकर्त्यांची कामगिरी दमदार, धर्मराज काडादी होणार आमदार!” असे चित्र निर्माण झाले आहे. 

यात प्रामुख्याने श्रीशैल इंडे, सत्यवान चवरे, बालाजी जाधव, रविशंकर कुंभार, प्रदीप उमरजीकर, महादेव सालोटगी, सुनील मुगळे, विकास सलबत्ते, खंडेराव कडबाने, सतीश व्होनराव, मल्लिकार्जुन कोळी, गोपी धायगुडे, अमोल पवार, लिंगाप्पा हिपळे, शंकर कोळी, सिध्दाराम हिपळे, गुलाब तांबोळी, सुरेश व्होनराव, ईश्वर लिंगशेट्टी, सोमा पोशट्टी, सचिन वाघमारे, नीळ डी. के.  आदींनी होम टू होम प्रचारात सहभाग घेतला. 

होम टू होम प्रचारात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावरून यावेळी जनता सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात बदल करणार असल्याचे मनोगत श्रीशैल इंडे, बालाजी जाधव व प्रदीप उमरजीकर यांनी सोलापूर वार्ताशी बोलताना व्यक्त केले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here