Amit Shah | ‘देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती पण…’ अमित शाह

Amit Shah: अमित शाह यांची शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका

0

कोल्हापूर,दि.१९: Amit Shah On Uddhav Thackeray: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापुरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. २०१९ मध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती, पण उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची पार्टी शरद पवारांच्या चरणात नेऊन ठेवली, अशी टीका अमित शाह (Amit Shah) यांनी केली.

…आमच्यावर एक पैशाचाही आरोप | Amit Shah

उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शाह म्हणाले, “मागील ९ वर्षांपासून आम्ही सरकार चालवत आहोत. पण १२ लाख कोटींचा घोटाळा करणारी काँग्रेस पार्टी आणि शरद पवार यांच्यासह त्यांचे सहकारी आमच्यावर एक पैशाचाही आरोप करू शकले नाहीत. आम्ही प्रामाणिकपणे काम केलं. मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप लावण्याची कुणाचीही हिंमत नाही.”

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक… | Amit Shah On Uddhav Thackeray

“२०१९ मध्ये आपण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो होतो. निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदींचा मोठा फोटो लावला होता. तर उद्धव ठाकरे यांचा लहान फोटो लावला होता. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत आहोत, असं तेही अनेकदा बोलले होते. मी आणि मोदींनीही अनेक ठिकाणी हेच बोललो होतो. पण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांच्या (उद्धव ठाकरे) तोंडाला पाणी सुटलं. त्यांनी आपल्या सर्व सिद्धांतांना मूठमाती देऊन ते शरद पवारांच्या चरणाजवळ जाऊन बसले,” अशा शब्दांत शाह यांनी हल्लाबोल केला आहे.

शाह पुढे म्हणाले, “भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री आमचाच बनायला हवा होता. आम्हाला सत्तेचा लोभ नाही. आम्ही सत्तेसाठी सिद्धांतांचा बळी दिला नाही. उद्धव ठाकरेंमुळे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पार्टी शरद पवारांच्या पायात जाऊन बसली होती. पण आता काळ बदलला आहे. खरी शिवसेना धनुष्यबाणासह भाजपाबरोबर आली आहे. आज एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे. आज त्यांना (उद्धव ठाकरे) धडा शिकवण्याचं कामही झालं.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here