जुळे सोलापूरात कुंटणखान्यावर छापा; एजंटांसह पाचजणांवर गुन्हा

0

सोलापूर, दि.२३: पोलिसांनी जुळे सोलापूरात (Jule Solapur) कुंटणखान्यावर छापा टाकून कारवाई केली आहे. सोलापूर (Solapur) शहरातील जुळे सोलापुरातील (Jule Solapur) रेणुका नगर येथील एका घरात वेश्या व्यवसायासाठी डांबून ठेवलेल्या एका महिलेची शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सुटका केली आहे. एजंटांसह पाचजणांवर विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

एजंटामार्फत वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रिती टिपरे यांनी सहायक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके यांच्या पथकासह छापा टाकून वेश्या व्यवसायासाठी डांबून ठेवलेल्या पीडितेची सुटका केली आहे. या कारवाईमध्ये रुकसार जावेद खान (रा. कुर्बान हुसेन नगर), रंजना धनंजय ठाकूर (रा. विवेकानंद केंद्राजवळ, रूमी नगर), सुचित्रा ज्ञानेश्वर जाधव (रा. होटगी, साईबाबा मंदिराजवळ, सध्या रा. रेणुका नगर) तसेच एजंट धनंजय प्रितम बिडला (रा. रूबी नगर) व रुषिकेश बळवंत अर्जुन (रा. इंदिरा नगरमागे, विजापूर रस्ता) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

संशयित आरोपीने पीडित महिलेस वेश्या व्यवसायासाठी डांबून ठेवून पैशाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेऊन तिच्या येणाऱ्या कमाईवर स्वतःची उपजीविका करीत असल्याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करणण्यत आला. या पाचजणांना अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी खान ही विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात फरार होती. तिला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त हरीश बैजल, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रिती टिपरे, सहायक निरीक्षक नंदकिशोर सोळुंके, पोलीस अंमलदार अशोक लोखंडे, शीतल शिवशरण, सचिन बावर तसेच दामिनी पथकाने केली आहे. अटक केलेल्या संशयित आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पारशेट्टी यांच्यासमोर हजर केले असता जाधव यांना न्यायालयीन कोठडी तर अन्य चौघांना २५ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यात सरकारतर्फे ॲड. सार्थक चिवरी तर आरोपोतर्फे ॲड. राज मात्रे, ॲड. माटुर यांनी काम पाहिले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here