रायगड,दि.२२: शिवसेना (शिंदे गट) नेते मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा आरोपी विकास गोगावले याला सहकार्य करण्यास नकार देणारे व निरपराध लोकांना अटक करण्यास विरोध करणाऱ्या पोलिस निरीक्षक रमेश तडवी यांनी थेट पोलीस महासंचालकांना पत्र लिहून कुटुंबासह आयुष्य संपवण्याचा इशारा दिला आहे. तडवी हे महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आहेत.
“तू खालच्या जातीचा आहेस, तू इथे कसा टिकतो तेच बघतो,” अशा शब्दांत पोलिस निरीक्षक तडवी यांचा होणारा अपमान आणि वरिष्ठांकडून होणारा मानसिक छळ याला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे. राजकीय दबावामुळे त्यांनी हा इशारा दिला आहे. तडवी यांना २०२४ पासून त्रास देण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
महाड नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या वादात आमदार भरत गोगावले यांच्या मुलाचे नाव असलेल्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी वरिष्ठांनी दबाव आणला होता, असा दावा तडवी यांनी केला आहे. तीन निष्पाप व्यक्तींना बेकायदेशीरपणे अटक करण्यास नकार दिल्यानेच आपल्याला टार्गेट केले जात असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी आपल्या पत्रात स्पष्ट आरोप केला आहे की, विकास गोगावले याला या प्रकरणातून वाचवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला होता. बेकायदेशीरपणे इतर तीन व्यक्तींना या गुन्ह्यात अटक करण्यासाठी तडवी यांना भाग पाडले जात होते, मात्र त्यांनी त्याला नकार दिला.
विकास गोगावले विकास गोगावले याला सहकार्य करण्यास नकार दिल्याने रमेश तडवी यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तडवी यांनी पत्रात स्पष्ट केले आहे की, ते आदिवासी भिल्ल समाजाचे असल्याने त्यांना वारंवार जातीवाचक हीन वागणूक देण्यात आली.
गोगावले यांना सहकार्य करण्यास नकार दिल्याने रमेश तडवी यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तडवी यांनी पत्रात स्पष्ट केले आहे की, ते आदिवासी भिल्ल समाजाचे असल्याने त्यांना वारंवार जातीवाचक हीन वागणूक देण्यात आली.








