मुंबई,दि.17: मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर Vivek Phansalkar एकुलत्या एक मुलीचा विवाह असताना त्यांनी कामाला आणि आपल्या जबाबदारीला प्राधान्य दिलं. कोणताही सण, उत्सव असो किंवा कोणताही मोठा कार्यक्रम असो, घरातील भांडण असो की राजकीय मोर्चा महाराष्ट्र पोलीस (Maharshtra Police) हे नेहमीच आपल्या कर्तव्यासाठी तत्पर असतात. यामुळे अनेकदा कौटुंबिक कार्यक्रमात हजर राहता येत नाही. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. एक कर्तव्यनिष्ठ बाप चक्क आपल्या एकुलत्या एक मुलीच्या लग्नातच हजर राहू शकला नाही. ही व्यक्ती आहे, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर. ही गोष्ट समोर आल्यानंतर आता त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मुंबईत आज महाविकास आघाडीचा महामोर्चा निघाला आहे. साहजिकच यासंदर्भातली कायदा आणि सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी मुंबई पोलिसांवर आणि पर्यायाने खात्याचे प्रमुख म्हणून पोलिस आयुक्त विवेक फणसळकर (Vivek Phansalkar) यांच्यावर होती.
हेही वाचा शरद पोंक्षे यांचं खळबळजनक ट्वीट, मला मुसलमान, ख्रिश्चनांची नाही भीती वाटत नाही मला _ _
पोलिस आयुक्त विवेक फणसळकर हे एकीकडे आपले कर्तव्य निभावत असताना त्यांच्यासाठी आजचा दिवस कौटुंबिकदृष्ट्याही फार महत्त्वाचा आणि भावनिक आहे. त्यांच्या कन्येचं आज लग्न आहे. संध्याकाळी हा सोहळा पार पडणार आहे. साहजिकच मोर्चाचं नियोजन आणि त्यात कन्येच्या लग्नासाठीच्या तयारीची लगबग ही दुहेरी कसरत त्यांनी गेले दोन दिवस केली. घरामध्ये इतका मोठा क्षण साजरा होत असतानाच त्यांनी कर्तव्याला श्रेष्ठ मानत मोर्चाच्या नियोजनाला, तयारीला प्राधान्य दिलं, ज्याचं कौतुक आता सोशल मीडियावर करण्यात येतंय.
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ऑन ड्युटी | CP Vivek Phansalkar
आज मुंबईत महाविकास आघाडीकडून भाजपविरोधात महामोर्चा काढण्यात आला होता, तर दुसरीकडे महाविकास आघाडीविरोधात भाजपने आज माफी मांगो आंदोलन करण्याची घोषणा केली होती. राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आज राजकीय पक्षाच्या मोर्चा आणि आंदोलनामुळे राजकीय हायव्होलटेज ड्रामा असे चित्र पाहायला मिळाले. या मोर्चा आणि आंदोलनात कायदा सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलिसांकडे होती. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी कायदा सुव्यवस्थेचे पालन करत मोर्चा आणि आंदोलन कोणतेही गालबोट न लागू देता नीट हातळले.
कोण आहेत विवेक फणसळकर?
विवेक फणसळकर हे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकात अतिरिक्त महासंचालक म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिली आहे. आणि त्यापाठोपाठ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखपदीही ते होते. कडक शिस्त आणि प्रामाणिकपणा या त्यांच्या गुणांमुळे ते खात्यात ओळखले जातात. फणसळकर यांची 31 जुलै 2018 रोजी ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती, त्यांची ठाण्यातील उत्तम कामगिरी पाहता राज्य शासनाने त्यांची बदली न करता मुदतवाढ दिली होती. सुमारे पावणे दोन वर्ष त्यांनी ठाणे शहर आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळला. सध्या ते मुंबई पोलीस आयुक्तपदी आहेत.