दिल्ली,दि.२६: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता संपूर्ण जगाला माहीत आहे. आता त्यांची लोकप्रियता सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे. नरेंद्र मोदींची आंतरराष्ट्रीय लोकप्रियता सर्वपरिचीत आहे. जगातील सर्वात लोकप्रिय राजकीय नेते म्हणून भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी अव्वल स्थानी आहेत. अर्थातच मोदींना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांचीही संख्या कोट्यवधीमध्ये आहे. त्यामुळे, मोदींच्या ट्विटर, इंस्टा आणि युट्यूब अकाऊंटवरुन मिलियन्स लोकांपर्यंत ते सहज पोहोचतात. नुकतेच नरेंद्र मोदींच्या अधिकृत युट्यूब चॅनेलने तब्बल २ कोटी सबस्क्राईबर्सचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे २ कोटी सबस्क्राईबर्सचा टप्पा पार करणारे पहिले राजकीय नेते आहेत.
काही दिवसांपूर्वीच आलेल्या एका अहवालानुसार नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगनुसार, नरेंद्र मोदी यांना तब्बल ७६ टक्के रेटिंग मिळाले आहे. हे रेटिंग २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीतील डेटाच्या आधारे जारी करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे पंतप्रधान मोदी यांचे डिसअप्रूव्हल रेटिंगही इतर नेत्यांच्या तुलनेत कमी आहे. ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर, दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचे राष्ट्रपती आंद्रेझ मॅन्युअल, तिसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंडच्या राष्ट्रपती अलेन बारसेट, ब्राझीलचे राष्ट्रपती लुला दा सिल्वा, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी हे आहेत. त्यामुळे, लोकप्रिय नेते असतानाही मोदींच्या सोशल मीडिया फॉलोअर्सची संख्याही लक्षवेधी आहे.
नरेंद्र मोदींच्या अधिकृत युट्यूब चॅनेलने २० मिलियन्स म्हणजेच २ कोटी सबस्क्राईबर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवरुन आत्तापर्यंत २३ हजार व्हिडिओ अपलोड केले आहेत. या सबस्क्राईबर्सच्या संख्येसह मोदींनी सोशल मीडियावर नवीन विक्रम स्वत:च्या नावे केला आहे. युट्यूबवर २ कोटी सबस्क्राईब असलेले जगातील पहिले राजकीय नेते बनण्याचा बहुमान मोदींना मिळाला आहे.