डिजिटल विश्वात ‘नमो’ लाट! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रचला जागतिक विक्रम

0

मुंबई,दि.३: मुंबई: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी डिजिटल जगात एक अभूतपूर्व यश संपादन केले आहे. यूट्यूबवर ३ कोटी (३० मिलियन) सब्सक्रायबर्सचा टप्पा ओलांडणारे ते जगातील पहिले आणि एकमेव नेते ठरले आहेत. या विक्रमासह त्यांनी परदेशातील दिग्गज नेत्यांना लोकप्रियतेच्या शर्यतीत खूप मागे टाकले आहे.

जागतिक स्तरावर ‘एक नंबर’

पंतप्रधान मोदींच्या डिजिटल पोहोचचा आवाका इतका मोठा आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या तुलनेत मोदींचे ७ पटीने जास्त सब्सक्रायबर्स आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो असून त्यांचे ६.६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर डोनाल्ड ट्रम्प ४ दशलक्ष फॉलोअर्ससह चौथ्या स्थानावर आहेत. थोडक्यात सांगायचे तर, जगातील दुसरा कोणताही नेता सध्या पंतप्रधान मोदींच्या आसपासही दिसत नाही.

भारतातही मोदींचाच दबदबा

केवळ जागतिक स्तरावरच नाही, तर भारतीय राजकारणातही डिजिटल व्यासपीठावर मोदींचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळत आहे. सबस्क्राइबर्सच्या बाबतीत मोदींची संख्या राहुल गांधींच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे. तसेच काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांसारख्या प्रमुख राजकीय पक्षांच्या एकत्रित फॉलोअर्सच्या तुलनेत मोदींचे फॉलोअर्स चार पटीने अधिक आहेत.

का महत्त्वाचा आहे हा टप्पा?

३० दशलक्ष सब्सक्रायबर्सचा हा आकडा पंतप्रधान मोदींची केवळ लोकप्रियताच नाही, तर त्यांचा जागतिक प्रभाव आणि लोकांशी संवाद साधण्याचे त्यांचे प्रभावी तंत्र अधोरेखित करतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी थेट नातं जोडण्यात पंतप्रधान मोदींनी एक नवा जागतिक ‘बेंचमार्क’ प्रस्थापित केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here