PF Balance तपासण्यासाठी कस्टमर केअरची मदत घेणे पडले महागात, 1.23 लाखांची फसवणूक

PF Balance Fraud: रिमोट ॲक्सेस ॲप डाउनलोड केल्यामुळे फसवणूक

0

मुंबई,दि.20: PF Balance Fraud: तपासण्यासाठी कस्टमर केअरची मदत घेणे एका व्यक्तीला महागात पडले आहे. त्या व्यक्तीची 1.23 लाखांची फसवणूक झाली आहे. अनेकजण आपला PF Balance तपासतात. सर्व नोकरदार लोक वेळोवेळी आपला पीएफ बॅलन्स तपासत राहतात. मात्र, जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल, तर ईपीएफओ कस्टमर केअरची मदत देखील घेतली जाऊ शकते आणि बॅलन्स तपासला जाऊ शकतो.

सर्वात सोपा मार्ग म्हणजे ईपीएफओच्या वेबसाइटवर जाणे किंवा उमंग ॲप डाउनलोड करणे. याठिकाणी  तुम्हाला पीएफ बॅलन्स किती आहे, याबाबत माहिती मिळेल. दरम्यान, अलीकडेच एका व्यक्तीला पीएफ बॅलन्स तपासणे महागात पडले आहे. जेव्हा त्याच्यासोबत असे काही घडले, ज्याची त्याला माहिती देखील नव्हती.

गुगलवर नंबर शोधण्याचा प्रयत्न

मुंबईतील एका 47 वर्षीय व्यक्तीने आपल्या पीएफ अकाउंटमधील बॅलन्स तपासण्यासाठी ईपीएफओ कस्टमर केअरची मदत घेण्याचा निर्णय घेतला, परंतु समस्या अशी होती की, त्या व्यक्तीकडे कस्टमर केअरचा नंबर नव्हता. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने गुगलवर नंबर शोधण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याला मिळालेला ईपीएफओ कस्टमर केअर नंबर बनावट होता आणि तो नंबर स्कॅमर्सच्या माध्यमातून अपलोड करण्यात आला होता.

रिमोट ॲक्सेस ॲप डाउनलोड करण्यास सांगितले

अंधेरीच्या एका 47 वर्षीय व्यक्तीला स्कॅमर्सनी रिमोट ॲक्सेस ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. फक्त येथेच व्यक्तीने चूक केली. त्यानंतर एकूण 14 वेगवेगळे व्यवहार करून त्याच्या अकाउंटमधून 1.23 लाख रुपये काढण्यात आले. ती व्यक्ती एका खाजगी कंपनीत कर्मचारी आहे. तुम्हालाही तुमच्या पीएफ अकाउंटचा बॅलन्स तपासायचा असेल, तर तुम्ही सावधगिरीने काम करावे आणि अधिकृत वेबसाइट किंवा उमंग ॲपची मदत घ्यावी. कस्टमर केअर नंबरचा वापर तेव्हाच केला पाहिजे जेव्हा तुम्हाला त्याबद्दलची योग्य माहिती असेल, अन्यथा तुम्हीही अशा फसवणुकीला बळी पडू शकता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here