मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवताच 100 किलो पेढे लाडू गायब

0

पैठण,दि.12: आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पैठणच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मोठ्या संख्येने लोक त्यांची भेट घेत आहे. पैठणमध्ये त्यांची आज जाहीर सभा होणार आहे. या सभेला गर्दी जमवण्यासाठी पैसे देऊन लोक आणले जात आहेत, असा दावा विरोधांकडून केला जात आहे. तशी एक कथित ऑडिओ क्लीपही सध्या व्हायरल झाली आहे. तर दुसरीकडे पैठण मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री संदीपान भुमरे यांनी हे सर्व आरोप फेटालून लावले आहेत.

पैठणमध्ये कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाडू आणि पेढ्यांनी तुला करण्याचा प्लान केला होता. यासाठीही सर्व तयारीही करून ठेवण्यात आली होती. अगदी तराजूही फुलांनी सजवूनही ठेवला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी तुला करण्यास नकार दिला. आणि मुख्यमंत्री तेथून निघून गेले. मुख्यमंत्री तेथून निघून जाण्याचा अवकाश आणि 100 किलो पेढे-लाडू अवघ्या 15 सेकंदात गायबच झाले.

येथे जमलेल्यांनी लाडू-पेढ्यांवर यथेच्छ ताव मारला. यावेळी संदीपान भूमरे यांचीही पेढे आणि लाडू तुला करण्यात येणार होती. मात्र काही वेळात स्थानिकांनीच यावर यथेच्छ ताव मारला.

मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात म्हणजेच पैठण येथे शिंदे यांची एक जाहीर सभा होणार आहे. या सभेआधी बिडकीन येथे मुख्यमंत्र्यांची पेढेतुला आयोजित करण्यात आली होती. मात्र ही पेढेतुला एकनाथ शिंदे यांनी नाकारली. त्यानंतर पेढेतुलेसाठी आणलेले पेढे पळवण्यासाठी मोठी गर्दी झाली. स्वागत समारंभाकडे शिंदे यांनी पाठ फिरवताच जमलेल्या गर्दीने लाडू आणि पेढे पळवले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here