Pathaan: शाहरुख खानच्या चाहत्यांनी थिएटरमध्येच फोडले फटाके, Video

Pathaan Movie: पठाण चित्रपट सुरू असतानाच थिएटरमध्येच फोडले फटाके

0

मुंबई,दि.२९: Pathaan: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) चित्रपट रिलीज झाला आहे. शाहरुख खान व दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) ‘पठाण’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. २५ जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होताच शाहरुखच्या चाहत्यांनी अगदी कहर केला. कोणी चित्रपटगृहाबाहेर फटाके फोडले तर कोणी शाहरुखच्या पोस्टरला दुधाचा अभिषेक केला. इतकंच नव्हे तर काही चित्रपटगृहांबाहेर चाहत्यांनी ढोल-ताशांच्या तालावर नाचायला सुरुवात केली. आता एक वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पठाण चित्रपट पाहून भारावले चाहते | Pathaan Movie

शाहरुखचे चाहते ‘पठाण’ चित्रपट (Pathaan Movie) पाहून भारावले आहेत. त्याच्या जबरा फॅननी तर संपूर्ण थिएटरच बुक केलं असल्याचीही माहिती समोर आली होती. आता तर ‘पठाण’ चित्रपट सुरू असताना चाहत्यांनी चित्रपटगृहामध्येच फटाके फोडले. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

चित्रपटगृहामध्येच फोडले फटाके | Pathaan

‘पठाण’च्या यशानंतर शाहरुखने #AskSRK ट्विटर सेशन घेतलं. या सेशनद्वारे चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. दरम्यान यावेळी एका चाहत्याने एक व्हिडीओ ट्वीट केला. या व्हिडीओमध्ये चाहते चित्रपटगृहामध्येच फटाके फोडताना दिसत आहेत. चित्रपट सुरू असतानाच हा प्रकार घडला.

मात्र हा प्रकार नेमका कुठे घडला हे अद्यापही समोर आलेलं नाही. “हा वेडेपणा कसा वाटला?” असं त्या चाहत्याने शाहरुखला विचारलं. मात्र यावेळी शाहरुखने या व्हिडीओला उत्तर देणं टाळलं. शाहरुखच्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ३०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. शाहरुख व दीपिकासाठी हे मोठं यश आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here