बेरोजगार उमेदवारांसाठी 31 जानेवारी रोजी विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

0

सोलापूर,दि.30: नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय पुणे आणि लोकमंगल फाऊंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विभागातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी बुधवार दि. 31 जानेवारी 2024 रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. पुणे विभागातील सदर विभागीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी आयटीआय, डिप्लोमा, ग्रॅज्युएट कोणतीही पदवी, इलेक्ट्रीशियन, नर्सिंग, बी कॉम, एम कॉम, एमबीए, डी फार्म, आटी टेक्निशियन, बीबीए, बी.पी.एड , एम.पी.एड, सहाय्यक शिक्षक अकाऊंटंट क्लार्क, ॲग्री डिप्लोमा , अशा विविध प्रकारची एकुण 2 हजार 117 पेक्षा जास्त रिक्तपदे पुणे विभागातील 19 उद्योजकांनी अधिसुचित केलेली आहेत.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी आपल्‍या कागदपत्रासह बुधवार दि. 31 जानेवारी 2024 रोजी सकाळ 10.00 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विजापूर रोड, सोलापूर रोड येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन पुणे विभागाच्या उपआयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.

याबाबत काही आडचण आल्यास कार्यालयाच्या 0217 -2950956 या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीव्दारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक सोलापूर येथे संपर्क साधावा असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता प्र.सहायक आयुक्त नलावडे यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here