जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी 4, 5 ऑगस्टला ऑनलाईन रोजगार मेळावा

0

सोलापूर,दि. 29: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांच्यामार्फत जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी दि. 4 व 5 ऑगस्ट 2022 रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली.

जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रोजगार मेळाव्यात ट्रेनी, आयटीआय फिटर, ईलेक्ट्रिशियन, विमा प्रतिनिधी, 10 वी पास, 12 वी, डिप्लोमा, पदवी, बी.एस.सी. केमेस्ट्री / एम.एस.सी. केमेस्ट्री अशा प्रकारची एकूण 180 रिक्तपदे पाच उद्योजकांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचीत केलेली आहेत.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावा, जेणेकरून त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल. रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून सहभागी व्हावे. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 0217-2950956 या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here