अत्त्याचार प्रकरणी एकास अटकपूर्व जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.१ जानेवारी २०२२: एका महिलेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी आरोपी गणेश ऊर्फ गणपती रामचंद्र चव्हाण (रा. बबलाद तांडा, ता. अक्कलकोट) यास न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

यात हकिकत अशी की, यातील पिडिता हिने दि . २५.० ९ .२०२१ रोजी आरोपी नामे गणेश उर्फ गणपती रामचंद्र चव्हाण, रा. परमानंद नगर, बबलाद तांडा, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर याच्याविरुध्द वेळोवेळी इच्छेविरूध्द बलात्कार केल्याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाणे मध्ये फिर्याद दाखल केली.

चव्हाण याच्याविरुध्द दुष्कर्म केल्याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपीने अटक होण्याच्या भीतीपोटी सदर आरोपीने अटक होण्याच्या भितीपोटी ॲड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला.

सदर जामीन अर्जाच्या युक्तिवादादरम्यान संशयित आरोपीच्यावतीने असा युक्तिवाद करण्यात आला की, सदरची फिर्याद ही खोटी असून, गावातील राजकारणामुळे विरोधकांनी कुंभाड रचून सदरची बनावट फिर्याद दाखल केलेली आहे. सदर गावामध्ये अनेक राजकीय गट असून, एकमेकांना शह देण्यासाठी व राजकीय कुरघोड्या करण्याकामी अशा बाबींचा वापर सर्रास केला जातो व राजकीय आकसापोटी निष्पाप संशयितावर अशा केसेस करायचे प्रमाण सध्याच्या काळात वाढलेले आहे. अशा गोष्टींना आळा बसणे न्यायाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. त्यापोटी संशयित आरोपीच्यावतीने अनेक उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल करण्यात आले. सदर युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधिश सोलापूर यांनी सदर संशयित आरोपीची अटकपूर्व जामीनावरती मुक्तता केली.

यात उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल करण्यात आले. न्यायाधिशांनी आरोपीची अटकपूर्व जामिनावर मुक्तता केली. यात आरोपीतर्फे ॲड. अभिजित इटकर, ॲड. दीपक टक्कळगी, ॲड. संतोप आवळे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here