महिला आमदाराचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एकाला अटक

0

दि.20: पंजाब प्रांतातील एका महिला आमदाराचा तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबतचा अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे. सानिया आशिक (Sania Ashiq) असे या महिला नेत्याचे नाव आहे. सानिया आशिक पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (PML-N) च्या सदस्या असून पंजाब प्रांतातील तक्षशिला विधानसभा मतदारसंघाच्या प्रांतीय (MPA) सदस्य आहेत. आमदार सानिया आशिक यांचा ( MLA Sania Ashiq ) कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल (Objectionable Video Viral) केल्याप्रकरणी आणि धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

सानिया आशिक (Sania Ashiq) यांच्या तक्रारीनंतर ही अटक करण्यात आली आहे. या व्हिडिओबाबत सानिया आशिकने 26 ऑक्टोबर रोजी सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणेकडे तक्रार केली होती. सखोल तपासानंतर पोलिसांनी व्हिडिओ लीक केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक केली आहे.

टिकटॉक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल सानियाने 26 ऑक्टोबर रोजी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (FIA) कडे अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर तपास सायबर गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. तपासानंतर बुधवारी व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. सध्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.

तक्रारीनंतर पंजाब प्रांतातील पोलीस आणि एफआयएने तपास सुरू केला. तीन आठवड्यांच्या तपासानंतर एफआयएने लाहोरमधून एका व्यक्तीला अटक केली. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी त्याची ओळख उघड केली नाही. व्हिडीओमध्ये दिसणारी महिला सानिया आशिक आहे की अन्य कोणी आहे हे देखील सांगण्यात आले नाही. या व्यक्तीच्या अटकेची केवळ माहिती देण्यात आली आहे.

सानिया आशिकचे ट्विट

सानियाने तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “त्यानं (अज्ञात) माझा व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल करण्यासोबतच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो पोस्ट केले आहेत. व्हिडिओतील महिला माझ्यासारखी दिसते आहे. त्यानंतर शेकडो धमकीचे कॉल, टिकटॉकवर अश्लील गाणी, फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, माझ्याशी संबंधित यादृच्छिक क्लिप म्हणजे माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here