Omicron Variant: अत्यंत वेगाने संसर्ग होणाऱ्या ओमिक्रॉनचा नवीन व्हेरिएंट आला समोर

0

Omicron Variant: भारतासह अनेक देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Variant) कहर केला आहे. अनेक देशात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट जास्त धोकादायक नसल्याचे दिसून आले आहे. भारतात रुग्णांची संख्या कमी होत आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा नवीन उपप्रकार समोर आला आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 38 कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाने लाखो लोकांचा बळी घेतला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून ओमिक्रॉनच्या नव्या उपप्रकारासंबंधी धोक्याची सूचना आणि सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसच्या अत्यंत वेगानं संक्रमक ठरत असलेल्या ‘ओमिक्रॉन’ या स्वरुपाचा आणखी एक उपप्रकार आढळून आला आहे. मूळ ओमायक्रॉन व्हेरिएंटपेक्षा हा उपप्रकार अधिक संसर्गजन्य ठरू शकतो, असं काही अभ्यासांतून दिसून येत आहे.

तब्बल 57 देशांमध्ये नवीन उप-प्रकारचे रुग्ण आढळून आल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहेत. अत्यंत वेगाने पसरणाऱा ओमायक्रॉन व्हेरिएंट सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये कोविड संसर्गाचं प्रमुख कारण ठरत आहे.

जवळपास 10 आठवड्यांपूर्वी हा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत प्रथम आढळून आला होता. जागतिक आरोग्य संघटनेनं आपल्या साप्ताहिक अहवालात कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ स्वरुपाचे अनेक उप-प्रकार आढळून आले आहेत असं म्हटलं आहे.

मागील महिन्यात गोळा करण्यात आलेल्या कोविडच्या सर्व नमुन्यांपैकी 93 टक्के रुग्ण ओमिक्रॉनबाधित आढळून आले होते. यामध्ये BA.1, BA.1.1, BA.2 आणि BA.3 या ओमायक्रॉनच्या उपप्रकारांचाही समावेश आहे, असं देखील म्हटलं आहे.

ओमिक्रॉनच्या 96 टक्के प्रकरणांत BA.1 आणि BA.1.1 ची ओळख पटवण्यात आली परंतु, BA.2 शी संबंधित रुग्णांत आता वाढ स्पष्टपणे दिसून येत असल्याचं WHO ने आपल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

BA.2 आपल्या मूळ व्हेरिएंटहून भिन्न उत्परिवर्तनांची गणना करताना आढळून येतो. या म्युटंटमध्ये स्पाईक प्रोटीनचाही समावेश आहे. जो शरीरात घुसून पृष्ठभागाला छेदून मानवी कोशिकांत सहजच प्रवेश मिळवण्यासाठी सक्षम आहे.

BA.2 या सब व्हेरियंट म्युटेशन प्रकारात 57 देशांतून GISAID कडे (जागतिक विज्ञान उपक्रम) सादर केले आहेत. काही देशांत या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या एकूण रुग्ण प्रमाणाच्या 50 टक्क्यांहून अधिक आहे असं जागतिक आरोग्य संघनटनेने म्हटलं आहे.

ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटना (WHO) जगातील सर्व देशांना कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराबद्दल सातत्याने धोक्याचा इशारा देत ​​आहे.

WHO ने लोकांना धोका अद्याप टळलेला नाही असं सांगितलं आहे. जगातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनच्या लाटेचा उच्चांक येणं बाकी आहे. त्यामुळे कोरोना निर्बंध (Covid 19 Restrictions) हे हळूहळू शिथिल केले पाहिजेत.

मंगळवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड-19 वर बनलेल्या टेक्निकल लिडने हा सल्ला दिला आहे. ऑनलाईन ब्रीफिंगमध्ये, डब्ल्यूएचओ अधिकारी मारिया वेन यांनी “आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत की अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या लाटेचा पीक येणं बाकी आहे.”

“अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination) दर खूपच कमी आहे आणि या देशांतील लोकसंख्येला कोविड-19 लस मिळालेली नाही. त्यामुळे अशावेळी सर्व बंधनं एकाच वेळी हटवू नयेत” असं म्हटलं आहे.

मारिया वेन म्हणाल्या की, आम्ही नेहमीच सर्व देशांना कोविड-19 निर्बंध हळूहळू शिथिल करण्याचं आवाहन केलं आहे. कारण हा विषाणू शक्तिशाली आहे. WHOचे सरचिटणीस म्हणाले की, काही देशांमध्ये असा विश्वास वाढत आहे की लसीकरणाचे चांगले दर आणि ओमायक्रॉनच्या कमी प्राणघातकतेमुळे धोका टळला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here