Omicron News: WHO च्या प्रमुखांनी सांगितले ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका कुणाला?

0

दि.१३: Tedros Adhanom On Omicron: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत देशात पुन्हा एकदा रुग्ण संख्येत (Corona Cases In India) मोठी वाढ झाली आहे. देशात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत. गेल्या २४ तासांतील आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या ही अडीच लाखाच्या जवळ गेली आहे. देशात २ लाख ४७ हजार ४१७ इतके नवीन रुग्ण गेल्या २४ तासांत आढळून आले आहेत. ही संख्या बुधवारच्या तुलनेत २७ टक्क्यांनी अधिक आहे.

ओमिक्रॉनमुळे (Omicron) रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) वेगानं पसरत असल्यानं सगळेच जण चिंतेत आहेत. अनेक राज्यांनी पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं (Word Health Organization) बुधवारी महत्त्वाची माहिती दिली.

ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका कोरोना प्रतिबंधात्मक लस (Corona Vaccine) न घेतलेल्यांना असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं. ‘डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनमुळे होणारी कोरोनाची लागण गंभीर नाही. पण हा व्हेरिएंट धोकादायक आहे.(Corona infection caused by Omicron is not serious but this variant is dangerous) विशेषत: कोरोना प्रतिबंधात्मक लस न घेतलेल्यांसाठी ओमिक्रॉन अधिक धोकादायक आहे,’ अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडनॉम घेब्येयियस (WHO Chief Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी दिली. 

कोरोना लस न घेतलेल्यांची संख्या लक्षणीय असल्याचं टेड्रोस एडनॉम घेब्येयियस म्हणाले. ‘आफ्रिकेतील ८५ टक्क्यांहून अधिक लोकांना अद्याप लसीचा एकही डोस मिळालेला नाही. लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय कोरोना महामारी संपणार नाही. त्यामुळे लसीकरण वेगानं पूर्ण करणं गरजेचं आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधलं. जगातील ९० टक्के देशांमध्ये ४० टक्के लसीकरणदेखील पूर्ण झालेलं नाही. यापैकी ३६ देशांनी १० टक्के लसीकरणाचा टप्पादेखील ओलांडलेला नाही, अशी आकडेवारी त्यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here