India: दि.26: भारतासह अनेक देशात मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अँड्रॉइड (Android) व iOS मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिमचे (Mobile Operating System) सर्वाधिक वापरकर्ते आहेत. Nokia चे Windows ऑपरेटिंग सिस्टिमचे मोबाईल काही काळ होते. मात्र Nokia ने त्याचे उत्पादन बंद केले. Android चे वापरकर्ते iOS पेक्षा जास्त आहेत. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम Google ची तर iOS ही Apple ची ऑपरेटिंग सिस्टिम आहे.
भारतात लवकरच स्वतः ची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम येणार आहे. सरकार गुगलच्या अँड्रॉइड (Google Android) आणि अॅपलच्या आयओएसला (Apple iOS) टक्कर देण्यासाठी स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम आणण्याच्या तयारीत आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrashekhar) यांनी याबाबत माहिती दिली आहे. सरकार यासाठी नवीन धोरणं तयार करत असून, यामुळे देशातच ऑपरेटिंग सिस्टम बनवण्यास मदत होईल, असंही ते म्हणाले.
मोबाइल फोनच्या जगात ऑपरेटिंग सिस्टम कमालीचं काम करत आहेत. यात Apple iOS आणि Google Android सामिल आहे. मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितलं, की या कंपन्या हार्डवेयर इकोसिस्टमला प्रभावित करत आहेत. हेच कारण आहे, की सरकार गुगल आणि अॅपलच्या ऑपरेटिंग सिस्टमला टक्कर देण्यासाठी एका पर्यायी प्लॅटफॉर्मवर काम करत आहे.
याबाबत बोलताना चंद्रशेखर यांनी सांगितलं, की सध्या अॅपल आणि गुगलशिवाय तिसरं कोणतंही ऑपरेटिंग सिस्टम नाही. अशात केंद्र सरकारकडे खास संधी आहे की आपण एक हँडसेट ऑपरेटिंग सिस्टम तयार करण्यासाठी प्रयत्न करू.
याबाबत अनेकांशी चर्चा सुरू आहे. यासाठी नवीन धोरणांवर काम करत आहोत. सरकार स्टार्टअप आणि शैक्षणिक इकोसिस्टममध्येच स्वदेशी ऑपरेटिंग सिस्टम विकसित करण्याच्या क्षमतेचा शोध घेत आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, सध्या देशातील इलेक्ट्रॉनिक्स निर्यात जवळपास 15 अब्ज डॉलरची आहे. एकीकडे देशात आपलं स्वत:चं ऑपरेटिंग सिस्टम तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे 6G नेटवर्कच्या संशोधनासाठी जिओ इस्टोनिया ओयु (Jio Estonia OÜ) ने फिनलँडमधील युनिव्हर्सिटी ऑफ Oulu सोबत (The University of Oulu) हातमिळवणी केली आहे. या दोन्ही घटकांच्या भागीदारीमुळे 6G नेटवर्कसाठी जगभरातील संधी शोधण्यासाठी एक भक्कम पाया प्रस्थापित होणार आहे. आता युनिव्हर्सिटीसोबत केलेल्या हातमिळवणीमुळे जिओच्या 5G क्षमतेचा आणखी विस्तार होईल. त्याच्या मदतीनं तंत्रज्ञानातील अत्याधुनिक संशोधन आणि विकासाव्यतिरिक्त 6G मधील वापराच्या शक्यता शोधण्याचं काम जिओ करू शकेल.