Aadhar Pan Linking:आता आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करण्यास भरावा लागणार इतका दंड

0

दि.9: Aadhar Pan Linking: आधार कार्ड (Aadhar Card) पॅन कार्ड (Pan Card) ही महत्वाची कागदपत्र आहेत. अनेक ठिकाणी ही कागदपत्रे लागतात. सिम कार्ड (Sim Card) घेण्यासाठीही आधार कार्ड लागते. पॅन कार्ड, आधार कार्ड ही सरकारी कागदपत्रं ओळखीचा पुरावा असण्यासोबतच अनेक महत्त्वाच्या कामांसाठी देखील उपयोगी येतात.

अजूनही तुम्ही तुमचे आधार कार्ड (Aadhaar Card) पॅन कार्डशी (PAN Card) लिंक केले नसेल, तर आता तुम्हाला या कामासाठी दुप्पट दंड भरावा लागणार आहे. 1 जुलै 2022 पासून पॅन-आधार लिंक करण्यासाठी लागणारा दंड दुप्पट करण्यात आला आहे. 30 जून 2022 पर्यंत पॅन-आधार लिंकिंग दंड 500 रुपये होता, मात्र 1 जुलैपासून तो 1000 रुपये करण्यात आला आहे.

असे करा पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक


– सर्वात आधी आयकर विभागाच्या नवीन वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/portal वर जा. पेजवर तळाशी दिलेल्या आधार लिंक वर क्लिक करा.
– तुमचे स्टेट्स पाहण्यासाठी  Click Here वर क्लिक करा. येथे तुम्हाला आधार आणि पॅनचे डिटेल्स द्यावे लागतील.
– जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले असेल तर Your PAN is linked to Aadhaar Number असे दिसून येईल.
– जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर Link Aadhaar वर क्लिक करावे लागेल.

असा भरावा लागेल दंड!

स्टेप 1: पॅन-आधार लिंकिंगसाठी https://onlineservices.tin.egov-nsdl.com/etaxnew/tdsnontds.jsp Protean या पोर्टलला भेट द्या. 
स्टेप 2 : पॅन-आधार लिंकिंग रिक्वेस्टसाठी CHALLAN NO./ITNS 280 वर क्लिक करा.
स्टेप 3: Tax Applicable निवडा.
स्टेप 4 : मायनर हेड 500 (फी) आणि मेजर हेड 0021 (कंपन्यांव्यतिरिक्त इन्कम टॅक्स) अंतर्गत सिंगल चालानमध्ये फी भरणे सुनिश्चित करा.
स्टेप 5 : नेटबँकिंग किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंटची पद्धत निवडा.
स्टेप 6 : पॅन क्रमांक प्रविष्ट करा, असेसमेंट इयर निवडा आणि पत्ता प्रविष्ट करा.
स्टेप 7: कॅप्चा प्रविष्ट करा आणि  Proceed टॅबवर क्लिक करा.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here