Noida Twin Tower Demolition: अखेर नोएडातील सुपरटेकचा ट्विन टॉवर जमीनदोस्त

0

नोएडा,दि.28: Noida Twin Tower Demolition: अखेर नोएडातील सुपरटेकचा ट्विन टॉवर (Noida Supertech Twin Towers) जमीनदोस्त करण्यात आला. अनेक वर्षांच्या कायदेशीर कारवाईनंतर अखेर आज नोएडामधील सुपरटेक ट्विन टॉवर पाडण्यात आला. दुपारी ठीक अडीच वाजता हा स्फोट झाला, त्यानंतर नऊ सेकंदात 32 मजली इमारत पाडण्यात आली.

नोएडाच्या सेक्टर 93-ए मध्ये बांधलेले सुपरटेक ट्विन टॉवर्स अखेर कोसळले आहेत. 13 वर्षांमध्ये बांधलेल्या या गगनचुंबी इमारती अगदी काही सेकंदात कोसळल्या. यासाठीची सर्व तयारी आधीच पूर्ण झाली होती, प्रशासनही हाय अलर्टवर होते. हे टॉवर कोसळताना घटनास्थळी एक रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथकही हजर होते.

सेक्टर-93-ए मध्ये बांधलेली 103 मीटर उंच एपेक्स आणि 97 मीटर उंच सियन टॉवर पाडण्यासाठी वेगवेगळ्या मजल्यांवर 3700 किलो स्फोटके लावण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव एमराल्ड कोर्ट आणि लगतच्या सोसायट्यांचे फ्लॅट रिकामे केले आहेत. याशिवाय सुमारे तीन हजार वाहने आणि 200 पाळीव प्राणीही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली आहेत. एडफिस इंजिनीअरिंगचे प्रकल्प व्यवस्थापक मयूर मेहता यांनी सांगितले की, पोलिसांकडून मंजुरी मिळाल्यानंतर ‘ट्रिगर’ दाबण्यात आला.

ट्विन टॉवर पाडण्यामागचं कारण काय?

2002मध्ये नोएडा अथॉरिटी सोसायटी बनवण्याची परवानगी दिली होती. त्यात 14 टॉवर, एक शॉपिंग कॉम्प्लेक्स बनवण्याची परवानगी देण्यात आली होती.

त्यानंतर सेक्टर 93Aमध्ये सुपरटेकला भूखंड देण्यात आला होता. जून 2006मध्ये अतिरिक्त भूखंड देण्यात आला होता. तसेच हौसिंग सोसायटीत बदल करण्याचीही परवानगी देण्यात आली होती.

मात्र, मूळ योजनेत बदल केल्यावर खरेदीदारांची सहमती घेण्यात आली नाही. या योजनेत आपल्या ग्राहकांना ग्रीन एरिया दाखवण्यात आला. 2009मध्ये बेकायदेशीरपणे ट्विन टॉवर बनवण्याचं काम सुरू झालं. त्यानंतर कंपनीने दिशाभूल करत ग्रीन एरियावर दोन टॉवर उभे केले.

कंपनीच्या या बांधकामाला रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनने विरोध केला. 2010 मध्ये RWA ने ट्विन टावर विरोधात कोर्टात धाव घेतली. मानकानुसार दोन्ही टॉवरच्या दरम्यान 16 फुटाचं अंतर असलं पाहिजे होतं. मात्र, ही मानके धाब्यावर बसून टॉवरमध्ये केवळ 9 मीटरचं अंतर ठेवलं गेलं. या प्रकरणाची पूर्ण सुनावणी झाल्यानंतर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2021मध्ये टॉवर पाडण्याचे आदेश दिले.

दोन्ही टॉवरची ऊंची किती?

एपेक्स टॉवर 102 मीटर

सियेन टॉवर 95 मीटर

कुतुबमीनार 73 मीटर

इंडिया गेट 42 मीटर


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here