Nitin Gopi Passes Away: 39 वर्षीय अभिनेत्याचं निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

0

बंगळुरू,दि.4: Nitin Gopi Passes Away: 39 वर्षीय अभिनेत्याचं निधन झाले आहे. कन्नड चित्रपट आणि टीव्ही अभिनेता नितीन गोपी (Nitin Gopi) यांचे शुक्रवारी, 2 जून रोजी सकाळी निधन झाले. नितीन 39 वर्षांचे होते आणि अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. बंगळुरू येथील घरी असताना अभिनेता गोपी यांना अचानक छाती दुखू लागले. त्यामुळे, त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नितीन गोपी यांनी कन्नड चित्रपट आणि टेलिव्हीजनवरील मालिकांमध्ये काम केलं आहे. 

कोण होते नितीन गोपी? | Nitin Gopi Passes Away

नितीन कन्नड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा होता. केवळ चित्रपटातूनच नाही तर टीव्ही शोच्या माध्यमातूनही त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. ‘हॅलो डॅडी’ हा त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात ते बासरीवादकाच्या भूमिकेत होते. याशिवाय त्यांनी Keralida Kesari, Mutthinantha Hendati, Nishabdha आणि Chirabandhavya या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

या चित्रपटांशिवाय ‘पुनर विवाह’ हा नितीनचा लोकप्रिय टीव्ही शो होता. हा शो प्रेक्षकांना खूप आवडला होता आणि त्याचा टीआरपी नेहमीच टॉपवर होता. त्यांनी ‘हर हर महादेव’ मध्ये पाहुण्या कलाकारांची भूमिका केली आहे, याशिवाय त्यांनी अनेक तमिळ टीव्ही शोमध्ये काम केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नितीन दुसऱ्या शोची तयारी करत होते. यासाठी एका कन्नड वाहिनीशी चर्चाही सुरू होती, मात्र त्यापूर्वीच नितीन हे जग सोडून गेले. त्यांचे जाणे इंडस्ट्रीतील लोकांसाठी आणि त्यांच्या जवळच्या लोकांसाठी मोठा धक्का आहे. नितीनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, ते विवाहित होते आणि त्यांना दोन मुली आहेत.

सतीश कौशिक यांचेही फेब्रुवारीमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मित्राला भेटण्यासाठी ते गुडगावला आले होते. येथे अचानक त्यांना झटका आला आणि रुग्णालयात पोहोचण्यास वेळ मिळाला नाही. कारमध्येच त्यांचा मृत्यू झाला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here