Nitesh Rane: नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत सुप्रीम कोर्टाने दिले हे आदेश

0

नवी दिल्ली,दि.२७: भारतीय जनता पार्टीचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) फेटाळला आहे. पण सुप्रीम कोर्टाने नितेश राणेंना १० दिवस अटकेपासून संरक्षण दिले आहे. शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी नितेश राणेंवर आरोप आहेत. या प्रकरणी गेल्या महिन्यात नितेश राणेंवर सिंधुदुर्गात गुन्हा दाखल झाला होता. जिल्हा सत्र न्यायालय, हायकोर्ट आणि त्यानंतर आता सुप्रीम कोर्टानेही नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

सुप्रीम कोर्टाने नितेश राणेंना अटकेपासून १० दिवसांचे संरक्षण दिले आहे. तसेच १० दिवसांत नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर व्हावे आणि न्यायालयाकडे रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करावा, असे सुप्रीम कोर्टाने आदेशात म्हटले आहे. सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी नितेश राणेंची बाजू मांडली. राजकीय हेतूने नितेश राणेंना गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.

हेही वाचा infertility: या सवयीमुळे पुरुषांच्या याच्यावर असा होतो परिणाम, लगेच सोडा ही सवय

काय आहे प्रकरण

सिंधुदुर्गमधील शिवसेनेचे पदाधिकारी संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. त्यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे आरोपी आहेत. या प्रकरणी निलेश राणे यांनी अटक टाळण्यासाठी कोर्टात धाव घेत अटकपूर्व जामीन अर्ज केला होता.

संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबरला झालेल्या जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणी कणकवली पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. या प्रकरणी आरोपी असलेल्या नितेश राणेंनी यांनी अटकपूर्व जामिनासाठी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयान अर्ज केला होता. त्यांचा अर्ज ३० डिसेंबरला फेटाळला. त्यांनी मुंबई हायकोर्ट धाव घेतली होती. मात्र, मुंबई हायकोर्टानेही १७ जानेवारीला त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here