दि.२१: नाणार रिफायनरीवरून कोकणातील पुन्हा एकदा विरोध प्रदर्शन सुरू झाले आहे. बारसू इथल्या माळरानावर सुरु असलेल्या सर्वेक्षणाच्या ठिकाणी ग्रामस्थांकडून विरोध प्रदर्शन सुरू आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी निलेश राणे यांचा ताफा अडवल्यानंतर राणे समर्थकांकडून त्यांना शिविगाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला. मात्र, त्यानंतर निलेश राणे यांनी हात जोडून ग्रामस्थांची माफी मागितली. ”जर आमच्यापैकी कोणी तुम्हाला शिविगाळ केली असेल, तर मी तुमची हात जोडून माफी मागतो”, असे ते म्हणाले.
“आपण जो विरोध करत आहात यातून लोकशाही मार्गाने मार्ग काढावा लागेल. मात्र, तुम्ही जो शिविगाळ केल्याचा आरोप करत आहात, जर कोणी तुम्हाला शिविगाळ केली असेल, तर मी तुमची हात जोडून माफी मागतो. तसेच आमच्या लोकांना समज देतो. तुम्ही आमची माणसं आहात. तुम्ही आणि आम्ही वेगळे नाहीत. मात्र, चर्चेने मार्ग निघू शकतो. त्यामुळे कृपा करून हा विषय चिघळू देऊ नका, शांत व्हा”, अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली.