राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांना दिला सल्ला

0

मुंबई,दि.8: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवसेना (Shivsena) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सल्ला दिला आहे. शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण कुणाला? याचा फैसला आता निवडणूक आयोगाकडे होणार आहे. ‘निवडणूक आयोगाचा जो निर्णय असेल तो दोन्ही पक्षाने मान्य करावा’ असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज नागपूरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना राज्यातील घडामोडींवर भाष्य केलं. तसंच, शिवसेना आणि शिंदे गटाला सल्लाही दिला.

‘शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे. धनुष्यबाणावर निर्णय निवडणूक आयोगाला द्यायचा आहे, निवडणूक आयोगाचा जो निर्णय असेल तो दोन्ही पक्षाने मान्य करावा, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेना आणि शिंदे गटाला दिला आहे.

ज्या समाजाने भूतकाळामध्ये वर्णव्यवस्थेतील इतर समाजावर अत्याचार केला. आज त्या समाजाचे नेतृत्व करणाऱ्या लोकांना त्या गोष्टीचा पश्चाताप होत आहे, ही सकारात्मक बाब आहे. मात्र फक्त भावना व्यक्त करून चालणार नाही तर तसे आचरणही करावे लागेल, असं म्हणत सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here