राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरण, सर्वोच्च न्यायालयाने दिले हे निर्देश

0

नवी दिल्ली,दि.29: राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचे निर्देश दिले आहेत. 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी निकाल दिला. एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिला.

राष्ट्रवादी आमदार प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर झाली आहे. आता निकालाची प्रतिक्षा आहे. दरम्यान, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी सुनावली झाली.

राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी राहुल नार्वेकर यांचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तीन आठड्यांचा वेळ मागितला होता. पण वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी याला विरोध केला. वेळ वाढवून मागणं हे नेहमीच होत आहे, त्यामुळे एकच आठवड्याची मुदत द्यावी असं मनु सिंघवी म्हणाले.

या सुनावणीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवरील अपात्रतेसंदर्भात निकाल 15 फेब्रुवारीपर्यंत द्या, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. नार्वेकरांनी याबाबत वेळ वाढवून मागितली होती, मात्र त्यांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here