मुंबई,१३: NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या साप्ताहिकातून मोठा दावा केला आहे. पक्षाच्या साप्ताहिकात अध्यक्षीय लेखात शिंदे यांनी मोठा दावा केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यावर सातत्याने चर्चा होत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरण होणार होते असे खासदार शरद पवार यांनीही म्हटले होते.
राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांनीही विलिनीकरण करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली होती. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत माझी अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती. आमच्यात जे बोलणे झाले होते ते दादांना माहिती होते, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी काल दिली होती.
राष्ट्रवादी (SP) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अध्यक्षीय लेखात म्हटले आहे की, ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या साप्ताहिकातून मोठा दावा करण्यात आला आहे. “विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय आमचा होता.”
विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत चर्चा थांबली होती, ती परत सुरू झाल्याचे दिसून येत आहे. शरद पवारांनी १२ फेब्रुवारीला विलीनीकरणाबाबत घोषणा होणार होती असे स्पष्ट केले होते. परंतु अजितदादांच्या निधनामुळे चर्चा थंडावली होती.
मात्र आता पुन्हा एकदा विलिनीकरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. साप्ताहिकेतील या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांनी याबाबत अनेक दावे केले होते. यासाठी बैठकाही झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिकात मोठा दावा केला आहे.
“विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचे सर्व नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देणार होतो. पण दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की, दादांचे स्वप्न पूर्ण करायचे. त्यासाठी प्रत्येकाने मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल”,असंही शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिकामध्ये म्हटले आहे.