मुंबई,दि.23: NCP Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाचा प्रदेशाध्यक्ष व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) प्रदेशाध्यक्ष व्हायचं नाही. ओबीसी नेत्यांना संधी मिळाली पाहिजे. राष्ट्रवादी पक्षांची मराठा पक्ष (NCP) ही इमेज पुसली जावी. म्हणून ओबीसी नेत्यांना संधी द्यावी, शरद पवार (Sharad Pawar) यांना या सगळ्या गोष्टी कळतात, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वक्तव्यांनंतर राष्ट्रवादी पक्षातच प्रदेशाध्यक्ष पदावरुन कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ | NCP Chhagan Bhujbal
आज छगन भुजबळ (NCP Chhagan Bhujbal) हे नाशिकमध्ये (Nashik) असून सकाळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. छगन भुजबळ यांनी यावेळी राष्ट्रवादी पक्षातील प्रदेशाध्यक्ष पदावरुन चाललेली धुसफूस, तसेच विरोधकांची आजची बैठक, महाराष्ट्रात बीआरएसची झालेली एंट्री या सगळ्या बाबींवर प्रकाश टाकला. ते यावेळी म्हणाले की, विरोधकांची आजची बैठक अतिशय महत्त्वाची असून काँग्रेसचे लोक देखील उपस्थित आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे हे देखील हजार राहतील. सर्व विरोधक एकत्र आल्याने राज्यावरील संकट बदलू शकतं, अशी आशा व्यक्त करत आपण सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे.
तसेच प्रदेशाध्यक्ष पदावरुन चाललेल्या वादावरुन छगन भुजबळ म्हणाले की, अजूनही देशात समाजा-समाजाचे राजकारण केले जात आहे. त्यावेळी प्रमोद महाजन असताना गोपीनाथ मुंडे यांना पुढे केले. काँग्रेसने हेच केले. पक्ष आणि विधिमंडळ येथील पदे वेगवगेळ्या समाजाला दिले जात आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाने तिकीट नाकारले होते. आमदार नसताना यांना अध्यक्ष केले. नाना पाटोले यांना देखील अध्यक्ष केले आहे. राऊत हे देखील ओबीसी असून काँग्रेसचा मी विरोधी पक्षनेता होतो. शिवसेना-बीजेपी विरोधात मी लढलो. माझ्यानंतर बबनराव पाचपुते यांना मोठ्या समाजाचे असल्याने प्रदेशाध्यक्ष केले. मी पण काम केले आहे. शरद पवार यांच्यासारखा देशाचा नेता असताना आपला मुख्यमंत्री होऊ शकला नाही. हे मनाला बोचतं अशी खंतही भुजबळांनी बोलून दाखवली.
त्यामुळे ओबीसी समाजाला संधी मिळाली पाहिजे, सर्वच पक्षात ओबीसी आहे. ममता बॅनर्जी आणि बाकी नेते आपल्या बळावर काम करत आहे. राजकारणात वेगवेगळ्या दमाचे लोक आहेत. आव्हाड, मुंडे, तटकरे यांचे नाव मी घेतले. भुजबळांना प्रदेशाध्यक्ष व्हायचं नाही. ओबीसी नेत्यांना संधी मिळाली पाहिजे. मराठा पक्ष ही इमेज पुसली जावी. म्हणून ओबीसी नेत्यांना संधी द्यावी, शरद पवार यांना या सगळ्या गोष्टी कळतात, असे सूचक विधानही यावेळी भुजबळ यांनी केले. दरम्यान भुजबळ पुढे म्हणाले की, वेगववगळ्या समाजात पदे वाटली पाहिजे. साधारण 91 पासून मी शरद पवार यांच्यासोबत आहे. मलाच करा असे नाही. राष्ट्रवादी मराठा लोकांची पार्टी नाही, पण लोकांमध्ये समज आहे. तो पुसला जावा, यासाठी ओबीसी नेत्यांना संधी दिली जावी, अशी अपेक्षा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.