NCP Banner: राष्ट्रवादीची बॅनरबाजी, बच्चू कडूंची आमदारकी कधी रद्द होणार?

0

पुणे,दि.25: NCP Banner: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर देशभरातून आंदोलन करण्यात येत आहेत. मानहानीच्या खटल्यात सूरतच्या जिल्हा कोर्टानं राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. याचे पडसाद शुक्रवारी देशभर उमटल्याचे पाहिला मिळाले. तसेच देशातील विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी या निर्णयाचा निषेध केला. दरम्यान आता याचे पडसाद पुण्यात पाहिला मिळत आहेत. पुण्यात आज शनिवारी राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. (Bachchu Kadu News)

बच्चू कडूंची आमदारकी रद्द करण्याची मागणी | NCP Banner

बच्चू कडूंची (Bachchu Kadu) आमदारकी (विधानसभा सदस्यत्व) रद्द करा, अशी मागणी करणारे बॅनर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पुण्यातील पाषाण रोड परिसरात लावले आहेत. यावर लिहिलं आहे की, “आमदार बच्चू कडू यांना काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यांची आमदारकी कधी रद्द होणार? नियम हे सर्वांना सारखेच असतात.” यासह या बॅनरवर काही टोलेदेखील पाहायला मिळाले आहेत.

बॅनरवर लिहिलं आहे की, “अपना भिडू! बच्चू कडू! आमदार बच्चू कडू यांना काही दिवसांपुर्वी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. त्यांची आमदारकी कधी रद्द होणार? नियम सर्वांना सारखेच असले पाहिजेत. निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान” असं बॅनरवर लिहिला आहे.

अज्ञानपणातून लावलेले पोस्टर्स: बच्चू कडू

दरम्यान, यासंदर्भात वृत्तवाहिनीने बच्चू कडू यांना सवाल केला असता आमदार म्हणाले की, “ही सगळी मुर्खता आहे. हे अज्ञानपणातून लावलेले पोस्टर्स आहेत. मला दोन कलमांमध्ये शिक्षा झाली आहे. दोन्ही मिळून केवळ एकाच वर्षाची शिक्षा झाली आहे. त्यामुळे ते मला लागू होत नाही. त्यांना काही कामं नाहीत. ही सगळी अज्ञानपणाची लक्षणं आहेत.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here