नाशिक,दि.२३: Nashik Crime News | अशोक खरात प्रकरणात (Ashok Kharat Case) मध्ये आता नवनवीन आणि थक्क करणारे खुलासे समोर येत आहेत. भोंदूगिरी आणि विज्ञानाचा चुकीचा वापर करून त्याने सामान्य लोकांपासून ते बड्या व्यक्तींपर्यंत सर्वांना कसे गंडवले, याची माहिती पोलिस तपासात (Police Investigation) मध्ये उघड झाली आहे. अंधश्रद्धेचे पितळ उघडे (Superstition Exposed) करणाऱ्या या प्रकरणात खरातने अत्यंत खालच्या स्तराच्या क्लृप्त्या लढवल्याचे स्पष्ट झाले आहे.
रिमोट कंट्रोल सापाचा ‘चमत्कार’ आणि तांत्रिक बनाव
अशोक खरात आपल्या आश्रमात किंवा पूजेच्या ठिकाणी नकली साप ठेवत असे. रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने या सापाच्या हालचाली करून तो लोकांना ‘नागदेवता’ प्रसन्न झाल्याचा भास करून द्यायचा. बोगस ज्योतिषी(Fraud Astrologer) खरात याने केवळ भीती घालून पैसे उकळण्यासाठी हा हायटेक बनाव रचला होता. स्वतःचा दरारा निर्माण करण्यासाठी तो बेकायदेशीरपणे वाघाचे कातडेही वापरत असे, ज्यामुळे आता त्याच्यावर प्राणी संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हाही दाखल होऊ शकतो.
पॉलिश केलेले चिंचोके आणि आर्थिक लूट
बाजारात अतिशय स्वस्त मिळणारे रानटी चिंचोके खरात पॉलिश करून चकाकणारे बनवत असे. हे चिंचोके ‘मंतरलेले’ असून ते घरात ठेवल्यास समृद्धी येईल, असे सांगून तो भाविकांना गंडवायचा. आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून तो केवळ १०० रुपयांच्या वस्तू समोरील व्यक्तीची आर्थिक क्षमता बघून १० हजार ते १ लाखांपर्यंत विकत असे. बनावट रत्ने आणि खड्यांना तो ‘सिद्ध’ केलेली रत्ने असल्याचे भासवून लोकांची आर्थिक फसवणूक करत होता.
तपासाची व्याप्ती आणि कायदेशीर कारवाई
महाराष्ट्रात (Maharashtra News) खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात केवळ बलात्कार आणि जादूटोणा विरोधी कायदाच नाही, तर फसवणुकीच्या गुन्ह्यांची व्याप्तीही वाढणार आहे. खरातकडे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची तो आधी सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी तपासायचा आणि त्यांनतर लुटीचे जाळे विणायचा. सायबर क्राईम नाशिक (Cyber Crime Nashik) आणि स्थानिक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.








