नाशिक बस अपघात हे ED मय भाजपच्या सरकारचे पाप: नाना पटोले

0

औरंगाबाद,दि.8: नाशिक बस अपघात हे ED मय भाजपच्या सरकारचे पाप असे म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. कारण राज्यात खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन नागरिक आपले जीव गमावत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. नाशिक-औरंगाबाद महामार्गावर खासगी बसला आग लागल्यामुळे 11 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

नाशिक -औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात शनिवारी पहाटे सव्वा पाच वाजता झालेल्या भीषण अपघातात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतला. या अपघातात बस मधील जवळपास सात ते आठ प्रवासी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेवर प्रतिक्रिया देत असताना नाना पटोले यांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडलं.

हा अपघात हा ed मय भाजपच्या सरकारचे पाप आहे. कारण राज्यात खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन नागरिक आपले जीव गमावत आहे.खड्डे मय रस्त्यांना हे सरकार जबाबदार आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

महाविकास आघाडीला सेक्युलर विचाराचे जो कुणी पाठिंबा देईल तो आम्ही घेऊ. मात्र हा निर्णय घेण्यासाठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्थानिक नेत्यांशी बोलावे. त्यामुळे निर्णय चांगला घेतला जाईल. आंबेडकर यांना दिल्लीशी बोलायचे असेल तर त्यांनी तेही करावे मात्र निर्णय स्थानिक नेत्यांशी बोलल्यावरच होईल, असंही नाना पटोले म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here