नवी दिल्ली,दि.२६: Narendra Modi On BJP Leaders | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपा नेत्यांना झापले आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये निरपराध लोकांना मारले. यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवला. अॅापरेशन सिंदूर राबवत भारताने दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. ज्या दहशतवादी लाँच पॅडवरून पाकिस्तानी सैन्य ड्रोन हल्ले करत होते. ते भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले आहेत.
अॅापरेशन सिंदूर नंतर भाजपा नेत्यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाले. ऑपरेशन सिंदूरबाबत भाजप आणि एनडीएतील अनेक नेते वादग्रस्त आणि अनावश्यक वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे पक्षाची चांगलीच गोची होत आहे. त्यामुळे याची पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दखल घेत त्यांनी भाजप नेत्यांना चांगलेच झापले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपा नेत्यांना झापले | Narendra Modi On BJP Leaders
भाजप नेत्यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत अनावश्यक वक्तव्ये करू नयेत, असे आदेशच त्यांनी दिले आहेत. दिल्लीत एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेत्यांना अशा वक्तव्यांबाबत फटकारले आहे. भाजपा नेत्यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाले होते.

ऑपरेशन सिंदूर आणि संबंधित मुद्द्यांवर भाजप नेत्यांनी अनुचित वक्तव्ये टाळणे गरजेचे आहे. पक्षाच्या सदस्यांच्या वादग्रस्त टिप्पण्यांमुळे जनतेचा रोष आणि कायदेशीर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पंतप्रताधांनी नेत्यांना अशी वक्तव्ये करण्याबाबत चांगलेच झापले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत काही भाजप नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे पक्षाला सर्व स्तरातील टीकेला तोंड द्यावे लागले होते.