नारायण राणे यांचा मराठा आरक्षण मसुद्याला विरोध म्हणाले…

0

मुंबई,दि.28: भाजपा नेते केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षण मसुद्याला विरोध केला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते. राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या केल्या. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले.

मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला आहे. हा मसुदा आहे, सुचना आहे असे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ म्हणाले. झुंडशाहीने कायदे बदलता येत नाही. उद्या लाखो लोक घेऊन अजून कोणी आले तर आपण कायदा बदलणार आहोत का? असा सवाल त्यांनी आपल्याच सरकारला केला.

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी देखील सरकारच्या मसुद्याला विरोध केला आहे. नारायण राणे यांनी ऑक्टोबरमध्ये मराठा समाजाला कुणबींचे आरक्षण देण्यास विरोध केला होता. राज्य सरकारला एखाद्या जातीला आरक्षण द्यायचे असेल तर त्यासाठीच्या घटनात्मक तरतुदी काय आहेत याचाही जरांगे यांनी अभ्यास करावा. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही. ९६ कुळी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र नको आहे. मी देखील मराठा आहे आणि मला कुणबी प्रमाणपत्र नको आहे. जरांगे म्हणतात तसे मराठा आणि कुणबी एकच आहेत असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असे राणे म्हणाले होते. यावरून जरांगे यांनी राणेंना प्रत्यूत्तर दिले होते.

काय म्हणाले नारायण राणे?

मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयाशी आणि दिलेल्‍या आश्‍वासनाशी मी सहमत नाही. यामध्‍ये ऐतिहासिक परंपरा असलेल्‍या मराठा समाजाचे खच्‍चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्‍याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. उद्या सोमवार दि. 29 जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्‍तर बोलेन, असे राणे म्हणाले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here