सोलापूर,दि.31: मुंबई – हैद्राबाद बुलेट ट्रेन (Bullet Train) सोलापूर जिल्ह्यातून जाणार्या बुलेट ट्रेनबाबत तर्क-विर्तकांना उधाण आले असून, ज्या प्रमाणे राष्ट्रीय महामार्गांचे काम काही अंतिम टप्यात व सुरू आहेत, मिळालेला मोबदला पाहता प्रत्यक्षात सुरवात कशी होणार, याबाबत सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. मुंबई – हैद्राबाद बुलेट ट्रेनचा मार्ग सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या सहा तालुक्यातील 62 गावातून जाणार असून, नुकतेच याचे सामाजिक सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे.
मुबंई – हैद्राबात ह्या 721 किलोमीटर लांबीचा हायस्पिड रेल कॉरिडॉर म्हणजे बुलेट ट्रेनचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालय भारत सरकारकडून मंजूर झाला आहे. यासह 17.5 मिटर रुंद जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार असून सदर जागेत येणार्या शेतकर्यांच्या जमिनीसाठी होणार्या सामाजिक परिणाम व पुर्नवसन यासाठीचे सर्वेक्षण करण्यात आले.
ज्या पध्दतीने राष्ट्रीय महामार्ग वेगाने पूर्ण होत आहे. त्याच वेगाने बुलेट ट्रेन सुध्दा होणार का? जमिनीचे भूसंपादन, मोबदला यासह प्रत्यक्षात कामास केव्हा प्रारंभ होणार? व पूर्ण होणार याबाबत तर्क -विर्तक काढले जात असून शेकडो हेक्टर शेत जमिनी जाणार असल्याने ज्यांच्या शेतातून जाणार आहे. त्यांना वेट अॅन्ड वॉच करावा लागणार आहे.
दरम्यान राज्यातील, देशातील अशा काही मोठ्या प्रकल्पांना वेळ लागल्याचे अनेक वेळा स्पष्ट झाले आहे. यामध्ये रेल मंत्रालय मागे राहिलेला नाही. राज्यातील अनेक रेलचे प्रस्ताव हे एक ते दोन दशके होऊन ही अद्याप पूर्ण झालेले नाहीत. तर मुंबई ते हैद्राबाद बुलेट ट्रेनच्या प्रस्तावाला देखील वेळ लागणार का? असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे. महानगर ते महानगरासह शहरे, तीर्थ क्षेत्रे जोडणार्या या महत्वकांक्षी प्रकल्पाला तातडीने प्रारंभ करून भूसंपादन मोबदला ही कामे लवकर करण्याची मागणी मोदी सरकारने घ्यावी, योजना आखल्या, सर्वेक्षणास सुरूवात झाली आणि वर्षानुवर्षे रखडली असे अन्य प्रकल्पा प्रमाणे होता कामा नये असे देखील जनतेतून बोलले जात आहे.
प्रकल्पात श्री क्षेत्र अक्कलकोटला थांबा, सर्वेक्षणा सारखे विषय तातडीने निकाली काढण्याची मागणी करून बुलेट ट्रेन बाधीत शेतकर्यां करिता विशेष कार्य शाळेचे आयोजन करणे हे देखील मागणी पुढे येत आहे. माळशिरस – 13 गावे, पंढरपूर – 18 गावे, मोहोळ- 10, उत्तर सोलापूर -8, दक्षिण सोलापूर- 4, अक्कलकोट -9 अशा 62 गावातील बाधित शेतकर्यांना सदर कार्यशाळेच्या माध्यमातून रेल कॉर्पोेरेशनने मार्गदर्शन करावे. काही जबाबदार जाणकार दीड ते दोन दशके सदरचा प्रकल्प पूर्ण व्हायला लागतील असे सांगितले जात असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.