जातीवाचक शिवीगाळ प्रकरण सपाटेस मुंबई उच्च न्यायालयातुन अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.26: लॉज मॅनेजर किरण रेवन साळवे,वय:-50, रा:- बुधवार पेठ, सोलापूर यास जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपी बाबासाहेब मनोहर सपाटे यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.

यात हकीकत अशी की, शिवपार्वती लॉज येथे मॅनेजर म्हणून कामास असलेला किरण साळवे यास गिऱ्हाईकाच्या कारणावरून दिनांक 13/10/ 2021 रोजी रात्री 12:30 च्या सुमारास आरोपी बाबासाहेब सपाटे याने जातिवाचक शिवीगाळ केली होती. अशा आशयाची फिर्याद दिनांक 14/10/2021 रोजी किरण साळले यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दिली होती.

त्यावरून आपणास अटक होऊ नये म्हणून आरोपी बाबासाहेब सपाटे याने जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज ठेवला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.

त्यावर आरोपी बाबासाहेब सपाटे याने मुंबई उच्च न्यायालयात ॲड. रितेश थोबडे यांचेमार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज ठेवला होता.

अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस, सदरच्या फिर्यादीचे अवलोकन केले असता सदरच्या फिर्यादी मधील लावली गेलेली कलमे ही कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायाधीशांनी 25000/- रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.

यात आरोपी बाबासाहेब सपाटे तर्फे ॲड. रितेश थोबडे यांनी तर सरकार तर्फे एस.व्ही.सोनवणे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here