Mohit Kamboj: मोहित कंबोज यांनी दिले नवाब मलिक यांच्यानंतर शिवसेनेच्या या नेत्यावर कारवाईचे संकेत

0

मुंबई,दि.४: Mohit Kamboj: मोहित कंबोज यांनी दिले नवाब मलिक यांच्यानंतर शिवसेनेच्या नेत्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची ईडी, सीबीआय चौकशी सुरू आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) व मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) सध्या तुरुंगात आहेत. आता लवकरच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर प्रत्यक्ष कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत. मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्विट करून तसा सूचक इशारा दिला आहे. मोहित कंबोज हे नवाब मलिक आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांचा उल्लेख ‘सलीम-जावेदची जोडी’ असा करतात. यापैकी सलीम तुरुंगात गेला आहे, आता जावेदही लवकरच जाईल, अशा आशयाचे ट्विट मोहित कंबोज यांनी केले आहे.

मोहित कंबोज यांचे हे ट्विट म्हणजे संजय राऊत यांच्यावर लवकरच कारवाई होणार असल्याचे संकेत आहेत का, याविषयी आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. या ट्विटमध्ये मोहित कंबोज यांनी म्हटले आहे की, संजय राऊत यांनी भाजपच्या साडेतीन भ्रष्ट नेत्यांची नावे बाहेर काढण्याचा इशारा दिला होता, त्याचे काय झाले? बाप-बेटे जेलमध्ये जाणार होते, त्याचे काय झाले? आर्थिक गुन्हे शाखा भाजपच्या नेत्यांवर कारवाई करणार होती,त्याचे काय झाले? संजय राऊत भाजप नेत्यांचे काळे धंदे बाहेर काढणार होते, त्याचे काय झाले?, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती मोहित कंबोज यांनी केली आहे. तसेच संजय राऊत हे फक्त मोठमोठ्या बाता मारतात, असा टोलाही मोहित कंबोज यांनी लगावला आहे. आता यावर संजय राऊत आणि शिवसेनेचे नेते काय प्रत्युत्तर देतात, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

प्लॅन फसला

संजय राऊत यांनी १६ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेतली होती. भाजपच्या नेत्यांना घाम फुटेल, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून संजय राऊत भाजपच्या नेत्यांवर खोट्या केसेस दाखल करण्यासाठी प्रयत्नशील होते. पण संजय राऊत यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. सलीम-जावेदची जोडी जास्त काळ वेगळी राहू शकत नाही, त्यांचे मिलन लवकरच होईल, असा खोचक टोलाही मोहित कंबोज यांनी लगावला.

गेल्या काही दिवसांमध्ये सक्तवसुली संचलनालयाने (ED) संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांची चौकशी केली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्याभोवतीही कारवाईचा फास लवकरच आवळला जाईल, अशी शक्यता वर्तविली जात होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here