mobile network down: या ग्राहकांना Jio देणार इतके दिवस अनलिमिटेड फ्री नेट

0

मुंबई,दि.6:देशातील आघाडीची मोबाईल नेटवर्क कंपनी Reliance Jio चे नेटवर्क डाऊन (mobile network down) झाल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील Jioची मोबाईल आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत जिओचे नेटवर्क डाऊन असल्यामुळे जिओ युजर्सना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. अनेकांना कॉल कनेक्ट करतांना त्रास झाला. तर, काहींचे मेसेजेस नेटवर्क नसल्यामुळे रिसिव्हरपर्यंत पोहोचले नाही. अनेक युजर्सने त्यांचे मोबाईल फोन वारंवार रिस्टार्ट देखील केले. Jio नेटवर्क शनिवारी जवळपास 8 तास ठप्प होतं. या काळात अनेक जणांनी जियोला यथेच्छ शिव्यांची लाखोलीही वाहून घेतली. परंतु रिलायन्स जियोने ग्राहकांच्या भावना ओळखून मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन दिवसांसाठी अनलिमिटेड मोफत डाटा देण्याची घोषणा रिलायन्स जियोने केली आहे. जियो युजर्सच्या मोबाईलवर कंपनीतर्फे तसा मेसेज पाठवण्यात आला आहे.

असा आहे मेसेज

प्रिय जियो ग्राहक, तुमच्या सेवेची गुणवत्ता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आज (शनिवारी) सकाळी, दुर्दैवाने, तुम्हाला आणि मुंबईतील इतर काही ग्राहकांना सेवेत व्यत्यय आल्याचा सामना करावा लागला. आमच्या टीमने या नेटवर्क समस्येचे काही तासांत निराकरण केले, परंतु हा तुमच्यासाठी आनंददायी अनुभव नसावा, अशी आमचा धारणा आहे. आम्ही त्याबद्दल दिलगीर आहोत. आम्ही तुमच्या नंबरवर दोन दिवसांचा अमर्यादित डेटा प्लॅन विनामूल्य जारी करत आहोत, जो आज (शनिवारी) रात्रीपासून लागू होईल. तुमच्या वर्तमान योजनेची वैधता संपल्यावर ही विनामूल्य योजना आपोआप सक्रिय होईल. तुमच्या सेवेच्या अनुभवाला सर्वोच्च महत्त्व देण्यास आमचे प्राधान्य आहे. – जियोकडून प्रेम


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here