मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित होण्याची शक्यता?

0

मुंबई,दि.20: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा स्थगित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. राज ठाकरे यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे 5 जूनला होणारा अयोध्या दौरा (Ayodhya Tour) पुढे ढकलला जाऊ शकतो, अशी माहिती मिळाली होती. पुणे (Pune) दौऱ्यावर असलेले राज ठाकरे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपला दौरा अर्धवट सोडला आणि ते मुंबईला (Mumbai) परतले होते. राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली असून त्याबाबतीत शस्त्रक्रीया करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच राज ठाकरे दौऱ्याबाबत अधिकृत माहिती काही वेळात देतील अशी माहिती मिळत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. मात्र, पुण्यातील सभा होणार असून मनसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज यांनी ट्वीटमध्ये केले आहे. प्रकृतीच्या कारणामुळे 5 जूनला होणारा अयोध्या दौरा (Ayodhya Tour) पुढे ढकलला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू होती.

उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांचा राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध असतानाच आता राज यांना उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्यांमुळे हा दौराच पुढे ढकलला जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. राज ठाकरेंची 22 मे रोजी पुण्यामध्ये सभा होणार आहे. मात्र या सभेनंतर राज ठाकरे अयोध्या दौऱ्यासंदर्भात डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे. डॉक्टरांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच राज ठाकरे दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र डॉक्टरांचा नकार असेल तर हा दौरा पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. राज यांची तब्बेतीच्या कारणास्तव दौरा पुढे ढकलला जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अर्थात ही चर्चा फक्त शक्यतांच्या आधारे केली जात असले तरी राज हे काही दिवसांपूर्वीच पुणे दौरा अर्धवट सोडून मुंबईला परतल्याच्या पार्श्वभूमीवर याकडे पाहिलं जात आहे.

मनसेच्या बाजूनं राज यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरु आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांतून मनसे कार्यकर्ते अयोध्येला पाठवण्याची तयारी सुरू आहे. यासाठी गाड्यांचे बुकिंग करण्यात येत आहे. राज ठाकरे अयोध्येत पोहोचण्यापूर्वी मनसे कार्यकर्ते तिथे पोहोचणार आहेत. यासोबतच सर्व कार्यकर्ते आपापल्या परीने लखनौ आणि अयोध्येला येणार आहेत. त्यामुळे आता अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे मनसैनिकांचं लक्ष लागलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here