मनसे: “मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांचे पाहुणे” मनसे नेत्याने व्हिडिओ केला ट्विट

0

मुंबई,दि.२३: मनसे नेत्याने मुख्यमंत्र्यांवर व्हिडिओ ट्विट करत टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. ठाण्यातल्या वर्तक नगर भागातील ‘निलांबरी’ अपार्टमेंटमधील एकूण ११ सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत. या सदनिका आणि एकूण जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची किंमत अंदाजे ६ कोटी ४५ लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे.

रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर (Shreedhar Patankar) यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर मंगळवारी कारवाई केली. यावरून आता मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं आहे.

ईडीच्या या कारवाईमुळे एकीकडे राजकारणात खळबळ उडाली असून विरोधक यावर जोरदार टीका करत आहेत. पण अशात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक मराठी चित्रपटातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. दुनियादारी या मराठी चित्रपटातली ही व्हिडीओ क्लिप आहे. ज्यामध्ये जितेंद्र जोशी “मेव्हणे, मेव्हणे, मेव्हण्यांचे पाहुणे” असा डायलॉग मारत आहेत. मनसेने हा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता शेअर केला आहे. तर याला ‘पाहुणे आले घरापर्यंत!’ असं कॅप्शनही दिलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here