अल्पसंख्याक मेळाव्यात सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाबाबत घेतला हा निर्णय 

0

सोलापूर,दि.31: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. नुकताच पार पडलेल्या अल्पसंख्याक मेळाव्यात सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून आमदार विजयकुमार देशमुख यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे.

248 शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ अल्पसंख्याक मेळाव्याचे आयोजन शुक्रवार पेठेतील बुजुर्ग अली हॅाल येथे करण्यात आले होते.

यावेळी मुस्लिम समाजातील बकर कसाब, कुरेशी, बागवान, मोमिन या अल्पसंख्यक समाजातील समाजबांधवांनी एकत्र येऊन आमदार देशमुख यांना पाचव्यांदा निवडुन देण्याचा निर्धार केला. आमदार देशमुख यांनी कुठलाही भेदभाव न करता शहर उत्तरमध्ये अनेक विकास कामे केल्यानेच आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे अल्पसंख्यक समाजाच्या ज्येष्ठांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी मोमिन खालीद कुमठे, आतिक कुमठे, बकर कसाब फौंडेशन मुनाफ उस्ताद बागवान, जमात हाजी मुश्ताक एमरोंड, रईस भाई नाफे, सज्जाद भाई शाबाद, उमर मर्चंट, कुरेशी जमात, जिलानी कुरेशी फयाज, अकबर बागवान, राष्ट्रवादीचे जुबेर बागवान, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आनंद चंदनशिवे, दशरथ कसबे, पिंटु डावरे, अमर पुदाले, किसन गर्जे यांच्यासह अल्पसंख्यक समाजाचे समाजबांधव भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here