आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेकडून धाड

0

मुंबई,दि.5: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेने धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी (दि.5) सकाळीच आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर केंद्रीय तपास यंत्रणेने छापेमारी सुरु केली आहे. 

तपास यंत्रणेने पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणेच्या पथकाने बारामती अ‍ॅग्रोची संबंधित एकूण सहा ठिकाणी धाड टाकल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बारामती अॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेने धाड टाकल्याची माहिती समोर आल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. झी24 ने याबाबत वृत्त दिले आहे.

केंद्रीय तपास यंत्रणेने बारामती अॅग्रोवर धाड टाकली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेकडून बारामती अॅग्रोसह सहा ठिकाणी झाडाझडती केली जात आहे. बारामती अॅग्रो या कंपनीत रोहित पवार हे कार्यकारी संचालक आणि त्यांचे वडील राजेंद्र पवार हे अध्यक्ष आहेत. केंद्राचे तपासणी पथक सकाळी दाखल झाल्यानंतर त्यांनी तपासणी सुरु केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या हे पथक ईडीचे आहे की कोणत्या दुसऱ्या तपास यंत्रणेचे याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here