MLA Rajan Salvi | शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना ACB ची नोटीस

वैभव नाईक यांच्यानंतर आता आमदार राजन साळवी यांना ACB ची नोटीस आली आहे

0

मुंबई,दि.3: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi) यांना ACB ने (अँटी करप्शन ब्युरो) नोटीस दिली आहे. यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांना ACB ने नोटीस बजावली होती. वैभव नाईक यांच्यानंतर आता राजन साळवी यांना अँटी करप्शनची नोटीस आली आहे. या नोटिसीमध्ये मालमत्तेसंदर्भात उल्लेख केला आहे. पाच तारखेला अलिबाग येथील अँटी करप्शन कार्यालयात हजर राहण्याचा नोटिशीत उल्लेख केला आहे.

आमदार वैभव नाईक यांनाही नोटीस

याआधी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अँटी करप्शन ब्युरोने वैभव नाईक यांना नोटीस पाठवली आहे. त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. वैभव नाईक यांनी यापूर्वीच अँटी करप्शन कार्यालय रत्नागिरीला मेल करत यापूर्वीच वेळ मागून घेतला आहे. वैभव नाईक यांनी त्यानंतर कुडाळ इथल्या अँटी करप्शन कार्यालयावर मोर्चा देखील काढला होता. त्यानंतर निलेश राणे यांनी काढलेल्या संविधान बचाव रॅलीमध्ये प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे नेते देखील सहभागी झाले होते. यावेळी वैभव नाईक यांच्यावर सरकार दबाव आणू पाहत आहे, असा आरोप देखील ठाकरे गटाकडून करण्यात आला होता.

जाहिरात

आमदार राजन साळवी यांना नोटीस

या साऱ्या घडामोडी घडत असताना आता आमदार राजन साळवी यांना देखील अँटी करप्शनची नोटीस आली आहे. या नोटिशीमध्ये त्यांना 5 डिसेंबर रोजी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. या नोटिशीनंतर राजन साळवी यांची प्रतिक्रिया अद्याप तरी मिळू शकलेली नाही.

विविध चर्चांना उधाण

ठाकरे गटातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा – राजापूर – साखरपा या विधानसभा मतदारसंघातील राजन साळवी हे आमदार आहेत. मागच्या काही दिवसांपासून ते शिंदे गटात जाणार, अशी चर्चा देखील सुरू होती. पण राजन साळवी यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. शिवाय त्यांच्या वरती दबाव टाकला जात आहे. पण राजन साळवी कुठेही जाणार नाहीत. ते मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या वतीनं यापूर्वीच दिली होती. पण सध्या अँटी करप्शन ब्युरोची आलेली नोटीस आणि मागच्या काही राजकीय घडामोडी, चर्चा यामुळे मात्र सध्या आलेल्या नोटिशीवरून विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here